Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेक्कन किंवा ओबामा, आपला फायदाच!

मेक्कन किंवा ओबामा, आपला फायदाच!

वेबदुनिया

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन या उभय पक्षांनी आशियाई देशांना अत्यंत महत्त्व दिले आहे.

NDND
उभयपक्षांनी भारताचे वाढते प्रस्थ पाहता भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वेळोवेळी आपल्या भाषणांतून भरताचे समर्थन केले आहे. मेक्कन यांनी अणू करारा प्रकरणी भारताचे जोरदार समर्थन केले होते तर ओबामांनीही पाकवर फैरी झाडत भारतीयांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक सुरू झाली असून, यात भारतीय मतांना अन्योन्य साधारण महत्त्व आहे. भारतीय मत ज्याला पडेल तो विजयी ठरणार असल्याचे अमेरिकेत बोलले जात आहे.
webdunia
NDND


मेक्कन हे भारत समर्थकच मानले जातात, तर दुसरीकडे सुरुवातीला भारताविषयी बोलण्याचे टाळणारे ओबामा निदान आज घडीला तरी भारताचे खंदे समर्थक असल्याचे भासवत आहेत. आऊटसोर्सिंगचा मुद्दा वळगता ओबामांनीही भारतीयांवर स्तुती सुमने उधळत भारताचे कौतुक केले आहे.

काश्मीर प्रश्नावर ओबामा आणि मेक्कन यांनी दबक्या आवाजात का होईना परंतु भारताचे समर्थन केले आहे, त्यामुळे मेक्कन आले काय किंवा ओबामा आले काय भारताचा यात फायदाच असल्याचे मानले जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi