Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PVC Aadhaar Card: आधारकार्डाचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आधार कार्डाच्या क्यू आर कोडला स्कॅन करा कसे करावे जाणून घ्या

PVC Aadhaar Card: आधारकार्डाचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आधार कार्डाच्या क्यू आर कोडला स्कॅन करा कसे करावे जाणून घ्या
, मंगळवार, 19 जुलै 2022 (14:12 IST)
PVC Aadhaar Card QR Code Scan :आजच्या काळात, ओळखीसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड इतर दस्तऐवजांपेक्षा वेगळे आहे कारण पत्ता, नाव, लिंग, सर्व नागरिकांचे वय, बायोमेट्रिक माहिती सोबतच नोंदवली जाते. हे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या सरकारी संस्थेने जारी केले आहे. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेसोबतच, UIDAI त्याची वैशिष्ट्ये सुधारण्यासाठी देखील काम करत आहे. जर तुम्हाला आधार कार्ड व्हेरिफिकेशन करायचे असेल तर तुम्ही पीव्हीसी आधार कार्डद्वारे व्हेरिफिकेशन करू शकता.
 
PVC आधारद्वारे पडताळणी करा-
PVC आधार कार्ड व्ह्यू अगदी डेबिट कार्डसारखे आहे आणि त्यात एक QR कोड आहे ज्याद्वारे नागरिक त्यांचे आधार कार्ड सत्यापित करू शकतात. या कार्डमध्ये UIDAI कडून अनेक प्रकारची सुरक्षा वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. त्यात नमुने, होलोग्राम, घोस्ट इमेज सह मायक्रो टेस्ट लावण्यात आले आहेत. याद्वारे तुम्ही कार्डची झटपट पडताळणी(Instant Verification) करू शकता. यासोबतच हे कार्ड पाण्याने भिजत नाही आणि त्याचा टिकाऊपणाही जास्त आहे.
 
पीव्हीसी आधार कार्ड कसे ऑर्डर करण्याची प्रक्रिया -
1. नवीन पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. यानंतर My Aadhaar Card च्या विभागावर क्लिक करा
3. पुढे Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा.
4. यानंतर, येथे 12 अंकी आधार क्रमांक टाका. येथे तुम्ही 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी देखील भरू शकता.
5. PIP सुरक्षा कोड आणि कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर Send OTP च्या पर्यायावर क्लिक करा.
6. यानंतर नोंदणीकृत मोबाईलवर OTP येईल, जो टाकायचा आहे.
7. यानंतर तुम्हाला आधारचे प्रिव्हयु मिळेल.
8. यानंतर तुम्हाला या कार्डचे पैसे द्यावे लागतील.
9.त्यानंतर 50 रुपयांमध्ये कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचेल.
 
पीव्हीसी कार्ड कार्डिंग करण्यासाठी ही फी भरावी
 यूआयडीएआय पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला फी जमा करावी लागेल. हे शुल्क 50 रुपये आहे. हे शुल्क तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI इत्यादी ऑनलाइन माध्यमातून भरू शकता.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG:इंग्लंडमध्ये मालिका जिंकून भारताने ICC क्रमवारीत वाढ केली