सध्याच्या काळात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातला आहे. त्याचा संसर्गाशी वाचण्यासाठी सावधगिरी बाळगल्यावर आपण ह्याचा दुष्प्रभावापासून स्वतःला वाचवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले हाथ वारंवार धुणे अत्यंत आवश्यक आहे. आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकता. बाजारात मिळण्यारा सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते काहींना त्याचा वापर करण्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. तसेच सध्याचा काळात बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा आहे. ह्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण घरातच सॅनिटायझर बनवू शकता.
चला मग घरात सॅनिटायझर कसे बनवता येईल जाणून घेऊ या...
साहित्य - एलोवेरा जेल, हेजल एक्सट्रॅक्ट, एसेंशियल ऑइल (टी ट्री, पिम्पमिंट, लिंबू, लवंग), एक रिकामी बाटली.
कृती - एका भांड्यात 3- 4 चमचे एलोवेरा जेल घेऊन त्याला मिसळून घ्या. यात हेजल एक्स्ट्रॅक्टचे 2 -4 थेंब आणि एसेंशियल ऑइल टाकून चांगले मिक्स करावे. त्यात थोडे पाणी घालून एका रिकाम्या बाटलीत भरून घ्यावे. हात मऊ करण्यासाठी आपण ह्यात व्हिटॅमिन ई चा वापर सुद्धा करू शकता. मग सॅनिटायझर वापरावे.