उत्तराखंडच्या राजकारणातील एक नाव सध्या खूप चर्चेत आहे. ते नाव आहे अनुकृति गुसाई यांचे. माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंग रावत यांची सून मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल आहेत. अनुकृति गुसाई उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे. त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अनुकृति गुसाई यांच्या संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या-
अनुकृती गुसाई यांचा जन्म 25 मार्च 1994 रोजी गढवाल, उत्तराखंड येथे झाला. त्यांनी आर्मी पब्लिक स्कूल लॅन्सडाउनमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेत नंतर डेहराडून इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.
अनुकृतीच्या वडिलांचे नाव उत्तम गुसाई आणि आईचे नाव नरवदा गुसाई आहे.
अनुकृती यांना सुरुवातीपासूनच मॉडेल व्हायचं होतं म्हणून त्या मुंबईला गेल्या आणि 2013 मध्ये त्यांनी मिस इंडिया दिल्लीचा किताब पटकावला.
2014 मध्ये मिस इंडिया एशिया पॅसिफिकचा मुकुटही घातला. 2014 मध्येच अनुकृती टाइम्स 50 च्या यादीत 49 व्या क्रमांकावर होत्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानासाठी अनुकृती यांना महात्मा गांधी पुरस्कार आणि उत्तराखंड फिल्म अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.