Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज पुण्यात मोदी आणि उध्दव यांची सभा

आज पुण्यात मोदी आणि उध्दव यांची सभा
, गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (15:04 IST)
राज्यातील 25 वर्षांची महायुती तुटल्यांतर एकमेकाविरूध्द निवडणूक लढवीत असलेल्या भाजप आणि शिवसेना या पक्षांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे  गुरूवारी म्हणजेच नऊ ऑक्टोबरला एकाच दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये असतील. 
 
मोदी यांची एक सभा तर उध्दव ठाकरे यांच्या दोन सभा पिंपरी- चिंचवडमध्ये होणार आहेत. या सभांच्या निमित्ताने दोन्ही पक्षांचे एकाच शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. साधारणत: एकाच दिवशी व एकाच वेळी ह नेते एकमेकांविषयी काय बोलतात, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर गुरूवारी दुपारी चार वाजता पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची संध्याकाळी साडेपाच वाजता सांगवीच्या पीडबल्यूडी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यम्ंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हे दोन दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर कसा हल्ला चढवतात, याविषयी देखील उत्सुकता दिसून येत आहे. 
 
पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर गुरुवारी दुपारी चार वाजता पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. त्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी साडेपाच वाजता भोसरी येथे तर साडेसहा वाजता सांगवीच्या पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. 
 
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो. या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात हे दोन दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेसवर कसा हल्ला चढवतात, याविषयी देखील उत्सुकता दिसून येत आहे.   
 
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते नलीन कोहली आणि गुजरातचे कायदामंत्री प्रदीपसिंग जडेजा यांनीए पत्रकार परिषदेत मोदी यांच्या सभेविषयी माहिती दिली. मोदी यांची पुणे जिल्ह्यातील एकमेव सभा पिंपरीमध्ये होणार असून त्याला किमान दोन लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा कोहली यांनी केला.
 
येत्या 15 तारखेला राज्यातील 15 वर्षांच्या कुशासनाचा अंत होईल, असा दावा कोहली यांनी केला. राज्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना ट्रेलर पहायला मिळाला आहे, असेही ते म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi