Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदींनी केली देवेंद्र फडणवीसांची भरभरुन प्रशंसा

नरेंद्र मोदींनी केली देवेंद्र फडणवीसांची भरभरुन प्रशंसा
नागपूर , बुधवार, 8 ऑक्टोबर 2014 (10:48 IST)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरमध्ये जाहीर सभा झाली. यात मोदींनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदार संघाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांची भरभरून प्रशंसा केली. त्यामुळे 'केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र', अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारमधील घोटाळे बाहेर काढले. या विरोधात विधानसभेत आवाज उठवल्याबद्दल मोदींनी फडणवीसांचे तोंडभरून कौतुक केले. यासोबत नागपूरमधील जनतेचे मोदींनी आभारही मानले. एक चांगल्या नेत्याची निवड केल्याचेही मोदींनी म्हटले.

उल्लेखनीय म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. फडणवीस यांच्या समर्थकांनी 'देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र' अशी घोषणा देऊन या चर्चेला आणखीनच खतपाणी घातले. महत्त्वाचं म्हणजे, नरेंद्र मोदींनी आपल्या संपूर्ण भाषणात गडकरी स्टेजवर असतानाही त्यांचा उल्लेख केला नाही तसेच भाजपचे आणखी एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार एकनाथ खडसे यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नाही. 

Share this Story:

Follow Webdunia marathi