केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटिस बजावली आहे. 'काय खायचं ते खाऊन घ्या, काय प्यायचे ते पिऊन घ्या. हरामाचा माल गरिबांकडे येण्याची हीच वेळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने गडकरी अडचणीत सापडले आहे.
गडकरी यांचे वक्तव्य आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नोटीसला आज (बुधवारी) सायंकाळपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे, नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरूड येथे एका व्यक्तीने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने गडकरींना बुट लागला नाही. बूट फेकणारा व्यक्त मद्यपी होता. भाजप कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.