आलियाने आईच्या हाती दिली पहिल्या चित्रपटाची कमाई, किती होतं मानधन?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने वयाच्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले

आलियासोबत या चित्रपटातून वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आलियाला तिच्या डेब्यू चित्रपटासाठी 15 लाख रुपये मानधन मिळाले होते.

एका मुलाखतीदरम्यान आलियाने सांगितले की, तिची पहिली कमाई खर्च करण्याऐवजी तिने ती तिच्या आईच्या हातात ठेवली होती

आलियाने हे देखील उघड केले की तिने वयाच्या 20 व्या वर्षी तिची पहिली कार ऑडी Q5 खरेदी केली होती

आलिया सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हायवे, आरआरआर, गंगूबाई काठियावाडी यांसारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे

आलिया भट्ट लवकरच 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतेच तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे

आलिया लवकरच रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'जी ले जरा' मध्ये दिसणार आहे

Raju Srivastava गरीब कुटुंबातून आलेला राजू श्रीवास्तव आज करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे

Follow Us on :-