कन्यादान मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत
सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असते
सन मराठी वरील कन्यादान ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय
अविनाश नारकर, उमा सरदेशमुख, संग्राम साळवी, अनिशा सबनीस, अमृता बने, प्रज्ञा चवंडे हे कलाकार ह्या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत
आता या मालिकेतील महाले कुटुंबात वंदू आत्याची एंट्री होणार आहे
अभिनेत्री निर्मिती सावंत वंदू आत्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे
आशालता आणि तिच्या तीनही मुलांसाठी आत्या ही नावडती व्यक्ती आहे
वंदू आत्या तिच्या स्वभावातील सकारात्मकता आणि प्रेम त्यांच्यापर्यत कसं पोहोचवणार हे पाहायला मजा येणार हे मात्र नक्की
वंदू आत्या भरपूर मजा-मस्ती, आनंद आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा परिपूर्ण खजिना घेऊन येणार आहे
entertainment
या लोकांनी काजू खाऊ नये Avoid Kaju
Follow Us on :-
या लोकांनी काजू खाऊ नये Avoid Kaju