Kitchen Vastu किचनमध्ये चुकूनही या 5 गोष्टी संपू देऊ नका

स्वयंपाकघर हे सर्वात महत्वाचे स्थान मानले गेले आहे. ही अशी जागा आहे जिथून आपल्या सर्वांच्या नशिबाचा निर्णय होतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

Webdunia

असं म्हटलं जातं की स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या कधीही संपुष्टात येऊ देऊ नयेत. या गोष्टी संपल्यातर नकारात्मकता वाढते

Webdunia

तर जाणून घ्या स्वयंपाकघरातील त्या 5 गोष्टी, ज्या चुकूनही संपुष्टात येऊ नयेत.

Webdunia

पीठ - घरातील पीठ पूर्ण संपण्यापूर्वी त्यात नवीन पीठ भरावे. पिठाची भांडी कधीही झटकू नयेत. यामुळे तुमचा पैसा कमी होतो व समाजात तुमचा मानही कमी होतो.

Webdunia

हळद - जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद संपली तर ती गुरु दोषासारखीच आहे. यामुळे पैशांची कमतरता भासते आणि त्याचा प्रभाव तुमच्या करिअरवर देखील पडतो.

Webdunia

तांदूळ - घरातील तांदळाचा शेवट शुक्राचा दोष दर्शवतो. शुक्र दोष निर्माण झाल्याने पती-पत्नीच्या नात्यातही कटुता येऊ लागते.

Webdunia

मीठ - स्वयंपाकघरात मिठाच्या कमतरतेमुळे राहुची वाईट नजर तुमच्यावर पडते आणि मग तुमचे काम बिघडू लागते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

Webdunia

मोहरीचे तेल - मोहरीचे तेल शनि ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. मोहरीचे तेल संपल्याने शनिदेवाच्या प्रकोपापुढे जावे लागते. शक्य असल्यास प्रत्येक शनिवारी मोहरीच्या तेलाचे दान करावे.

Webdunia

हातात तांब्याचा कडा घालण्याचे 10 फायदे

Follow Us on :-