नशीबात पैसा आहे की नाही हे जाणून घ्या या 13 चिन्हांवरून

सागरी आणि हस्तरेषाशास्त्रानुसार, 13 चिन्हांवरून जाणून घ्या भाग्यात पैसा आहे की नाही-

Webdunia

ज्या व्यक्तींची छाती रुंद, नाक लांब आणि नाभी खोल असते, त्यांना तरुण वयातच अमाप संपत्ती मिळते.

ज्या लोकांच्या पायात कर्ब, कुंडली किंवा चक्राचे चिन्ह असते, ते शासक, मोठे व्यापारी किंवा अधिकारी बनतात.

ज्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ किंवा पायाच्या तळव्यावर तीळ असतो तो खूप श्रीमंत होतो.

ज्या व्यक्तीच्या छातीवर जास्त केस असतात, तो सामान्यतः श्रीमंत असतो.

ज्या व्यक्तीच्या हातात 5 नाही तर 6 बोटे असतात, अशा लोकांचे नशीब चांगले असून ते श्रीमंत होतात.

ज्या लोकांच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असतो, त्यांची आर्थिक स्थिती खूप मजबूत असते.

उजव्या गालावर तीळ धारण करणारे धनवान मानले जातात.

श्रीमंत लोकांच्या अंगठ्यामध्ये यव चिन्ह असते.

श्रीमंत लोकांच्या हातावरील रेषा जास्तकरून खोल असतात.

हातात मकर, ध्वज, कोष्ठ आणि मंदिराच्या विशेष रेषा असतील तर तो व्यक्ती खूप श्रीमंत असतो.

ज्या महिलांच्या डाव्या हाताच्या तळव्याच्या मध्यभागी तीळ, ध्वज, मासे, वीणा, चक्र किंवा कमळाचे चिन्ह असेल तर त्या लक्ष्मीच्या समान असतात.

ज्या पुरुषांच्या हातावर किंवा पायावर मासे, कर्ब किंवा वीणाचे ठसे असतात ते अल्पावधीत धन आणि प्रतिष्ठा कमावतात.

ज्या स्त्री किंवा पुरुषाच्या पायावर चाक, चक्र, कमळ, बाण, रथ किंवा सिंहासनासारखे चिन्ह असते, त्यांचे जीवन आनंदी होते.

ही 10 झाडे घराभोवती नसावीत

Follow Us on :-