मैत्री हे जगातील एकमेव नातं आहे… जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं

मैत्री म्हणजे थोडं घेणं मैत्री म्हणजे खूप देणं....मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाणं...

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही...

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे... जुन्या आठवणींना उजाळा देत गालातल्या गालात हसणारे...

जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते, दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात...

जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं… तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री...

मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं... एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं...

किती कमाल असते ना ही मैत्री, वजन तर असतं… मात्र ओझं असतं नसतं...

एका मित्रासोबत अंधारात चालणे, एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले...

हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मैत्री...

Baking Soda Hacks बेकिंग सोडा किचन हॅक्स

Follow Us on :-