ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची भारतातील G20 शिखर परिषदेत अनेक सुंदर छायाचित्रे समोर आली आहेत, परंतु तुम्हाला त्यांची प्रेमकथा माहित आहे का?

भारतीय वंशाचे ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे मूळचे पंजाबी आहेत परंतु त्यांचा जन्म पूर्व आफ्रिकेत झाला होता.

अक्षता ही इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि लेखिका सुधा मूर्ती यांची मुलगी आहे.

अक्षताने कॅलिफोर्नियाच्या Claremont McKenna Collegeमधून अर्थशास्त्र आणि फ्रेंचमध्ये बीए आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे.

सुनकने लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर एमबीए करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले.

अक्षताने सुनकची स्टॅनफोर्ड विद्यापीठात भेट घेतली. दोघांची आधी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

रिपोर्ट्सनुसार, नारायण मूर्ती सुरुवातीला अक्षता आणि ऋषी सुनक यांच्या लग्नाबद्दल फारसे उत्साहित नव्हते.

पण ऋषी सुनक यांना भेटल्यानंतर त्यांचा दृष्टीकोन बदलला आणि ते म्हणाले की ऋषी एक हुशार, देखणा आणि प्रामाणिक मुलगा आहे.

भारताने बांधले जगातील पहिले Portable Disaster Hospital

Follow Us on :-