अनारसे विरघळत असतील तर त्याची कारणे जाणून घ्या आणि हे उपाय नक्की करून बघा
अनारसे विरघळत असतील तर कोरड्या पिठात 2 चमचे गरम तुप घातल्याने ते कुरकुरित मस्त हल्के जाळीदार होतात.
अनारस्याच्या हुंडीला कोरडे तांदळाचे पीठ घालून मळून ठेवावे.
अनारसे पीठ व्यवस्थित मुरले तरच अनारसे विरघळत नाही त्यामुळे ते चांगले भिजू द्या आणि मग करा.
अनारस्याची हुंडी सैल झाली असल्यास त्यावर उपाय म्हणून 1 दिवस तांदूळ भिजत ठेवा व त्याचे पिठ बनवा व हे बनविलेले पिठ पातळ झालेल्या हुंडीत मिक्स करा
अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्यादिवशी अनारसे करा.
पीठ पातळ झाल तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा दोन दिवस भिजत ठेवा मग अनारसे बनवा.
lifestyle
पावसाळ्यात काय करू नये?
Follow Us on :-
पावसाळ्यात काय करू नये?