महाशिवरात्रीचा सण का साजरा केला जातो?
महाशिवरात्री हा सण साजरा करण्याची अनेक कारणे आहेत, जाणून घ्या काही प्रमुख कारणे-
Webdunia
ईशान संहितेनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीच्या रात्री शिव करोडो सूर्यांप्रमाणेच शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले.
फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला चंद्र सूर्याच्या जवळ असतो. त्याच बरोबर जीवन रूपी चंद्राचे शिव रुपात सूर्यासोबत मिलन होते.
असे मानले जाते की सृष्टीच्या प्रारंभी, या दिवशी मध्यरात्री भगवान शिव निराकारातून भौतिक रूपात अवतरले होते.
प्रलयाच्या वेळी, या दिवशी प्रदोषाच्या वेळी, शिव तिसऱ्या डोळ्याच्या ज्योतीने ब्रह्मांड जाळून राख करतात.
याच दिवशी भगवान शंकराचाही विवाह झाला होता. म्हणूनच रात्री शंकरजींची मिरवणूक काढली जाते.
महाशिवरात्रीच्या व्रताची कथा चित्रभानू नावाच्या शिकारीशी संबंधित आहे जो नकळत भगवान शिवाची पूजा करतो आणि त्यांच्या कृपेचा पात्र बनतो.
हलाहल विष प्यायल्याने शिवजींना नीलकंठ म्हणत. या विषबाधाच्या रात्रीच्या स्मरणार्थ महाशिवरात्रीचा उत्सवही साजरा केला जातो.
या रात्री भगवान शंकराने सृष्टी उत्पत्तिच्या इच्छेने स्वतःचे ज्योतिर्लिंगात रूपांतर केले.
religion
Samarth Ramdas Swami Famous Manache Shlok समर्थांचे मनाचे श्लोक
Follow Us on :-
Samarth Ramdas Swami Famous Manache Shlok समर्थांचे मनाचे श्लोक