या दिवशी अभिजित मुहूर्तावर प्रभू श्री रामाच्या बालस्वरूपाची पूजा व आरती करावी.

बालक रामललाला झुल्यात बसवून, झुला सजवून पूजा केली जाते.

रामाची मूर्ती फुलांनी आणि हारांनी सजवा आणि ती स्थापित केल्यानंतर पाळणामध्ये झुलवा.

त्यानंतर खीर, फळे, मिठाई, पंचामृत, कमळ, तुळस आणि फुलांची माळ श्रीरामाला अर्पण केली जाते.

नैवेद्य अर्पण केल्यानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.

या दिवशी पंजिरीचा प्रसाद पंचामृतासह धन्याच्या पूडमध्ये गूळ किंवा साखर मिसळून वाटला जातो.

या दिवशी रामायणाचे पठण केला जातो.

या दिवशी रामरक्षा स्रोतांचे पठणही केले जाते.

अनेक ठिकाणी भजन-कीर्तनाचे आयोजनही केले जाते.

सर्वांना राम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा.

गणगौर तीजची पूजा कशी करावी

Follow Us on :-