होळी कधी आहे ? 6, 7 किंवा 8 मार्चला?

होलिका दहन बद्दल संभ्रम, 6, 7 किंवा 8 मार्च? होळीनंतर कधी राहील धुलेंडी, जाणून घ्या-

Webdunia

होलिका दहन हा प्रदोष काळात पौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी धुलेंडीचा सण साजरा केला जातो.

पौर्णिमा तिथी सोमवार, 06 मार्च रोजी दुपारी 04:17 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 07 मार्च रोजी 06:09 वाजता समाप्त होईल.

06 मार्च ह्या प्रदोष कालात पौर्णिमा तिथी आहे पण 7 ला पौर्णिमा तिथीत प्रदोष काल नसेल.

अनेक ठिकाणी पंचांगात फरक असल्याने 06 मार्चला होलिका दहन होणार आहे, कारण या दिवशी प्रदोष काळात पौर्णिमा असेल.

06 मार्चला पौर्णिमा तिथी सुरू झाल्यामुळे, भाद्राचीही सुरुवात होईल, जी 07 मार्चपर्यंत सकाळी 05:15 पर्यंत राहील. मान्यतेनुसार होलिका दहन हे भद्रामध्ये होत नाही.

दुसऱ्या एका मतानुसार पौर्णिमा तिथी दोन दिवस प्रदोष व्यापिनी असेल तर दुसऱ्या दिवशी होलिका दहन केले जाते.

म्हणजेच, होलिका दहन 07 मार्च रोजी संध्याकाळी किंवा रात्री होईल आणि दुसऱ्या दिवशी धुलेंडीचा सण साजरा केला जाईल.

बहुतेकांच्या मते, होलिका दहन 07 मार्च रोजी होईल आणि होळी 08 मार्च रोजी धुलेंडीचा सण साजरा केला जाईल.

होळीच्या शुभेच्छा

या 10 वस्तूंमुळे कर्ज वाढते

Follow Us on :-