हनुमानजींना विड्याचे पान अर्पण का करतात ?

'पुढाकार घेणे' म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या किंवा जोखमीच्या कामाची जबाबदारी स्वत:वर घेणे ही म्हण ऐकली असेलच.

आयुष्यात एखादे मोठे संकट आले तर संकट निरसन करण्याची जबाबदारी हनुमानजींना सोपवण्यासाठी विड्याचे पान अर्पण करा.

हनुमानजींना गुलकंद, बडीशेप, लवंग, खोबरा किस आणि सुमन कात्री घालून गोड पान अर्पण केले जाते. त्यात काथ, सुपारी, चुना टाकला जात नाही.

मंगळवारी त्यांची विधिवत पूजा केल्यानंतर त्यांना नैवेद्या सोबत विड्याचे पान अर्पण करून इच्छा मागितली जाते.

हनुमानजींना विड्याचे पान अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात.

विड्याचे पान अर्पण केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख-समृद्धी वाढते.

हनुमानजींना विड्याचे पान अर्पण केल्याने हनुमानाजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या मनात निर्भयतेचा संचार होतो.

विड्याचे पान अर्पण करताना म्हणा, 'हे हनुमानजी, हे गोड विड्याचे पान अर्पण करत आहे. या गोड पानांप्रमाणे आमच्या आयुष्यात गोडवा असू द्या.

घरामध्ये पारिजात लावल्यास काय होईल, जाणून घ्या त्याचे शुभ परिणाम

Follow Us on :-