Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ध्यानामुळे मेंदूतील छुपे संकेत शोधण्यास मदत होते!

ध्यानामुळे मेंदूतील छुपे संकेत शोधण्यास मदत होते!

वेबदुनिया

WD
भारतीय संस्कृतीत अष्टांगयोगामध्ये ध्याचा समावेश होतो. विपश्यना आणि झेन ध्यानाच्या पद्धतीही जगभरात प्रचलित आहेत. अशा ध्यानामुळे शरीर व मनाला मोठाच लाभ मिळत असतो. आता संशोधकांनी म्हटले आहे की ध्यानामुळे मेंदूतील छुपे व सूक्ष्म संकेत समजून घेण्याची क्षमता निर्माण होते. हे कालन करणे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही.

असे संकेत एरवी आपल्या आवाक्याबाहेरचेच असतात, मात्र, ध्यानाने जी क्षमता वाढते तिच्यामुळे हे छुपे संकेतही समजून घेण्यास मदत मिळते. आपल्या जारिवेच्या कक्षेबाहेर असे संकेत असतात. ते मेंदूने नोंदवलेले असतात, पण आपल्याला त्यांची जाणीव होत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी नियमित ध्यानधारण उपयुक्त ठरते. या संशोधनासाठी नेदरलँडच्या संशोधकांनी झेन ध्यानधारण करणार्‍या 34 साधकांना सहभागी करून घेतले.

वीस मिनिटे ध्यानधारणा केल्यावर जे परिणाम समोर येतात ते वीस मिनिटे नुसताच आराम केल्याने मिळणार्‍या लाभापेक्षा अधिक मोठे असतात असे त्यांन दिसून आले. या साधकांना काही प्रश्न विचारून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले.
0

Share this Story:

Follow Webdunia marathi