Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!

योगासने करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या!

वेबदुनिया

योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणार्‍यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे. 

लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल.

कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.

रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे.

अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते.

योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.

लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणार्‍यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे