Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Simple Yoga Poses सोप्या योगासनाने वाढवा आपलं पौरुषत्व

, मंगळवार, 25 एप्रिल 2023 (23:01 IST)
हल्लीच्या काळात कामाचे वाढते तास, ताण-तणाव, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, जीन्ससारखे तंग कपडे यांचा परिणाम पुरूषांच्या पौरुषत्वावर होत असतो. अन्नामुळे ताकद निर्माण होत असते आणि तसंच वीर्यवृद्धीही होत असते. त्यामुळे शरीरीतील वीर्य टिकवण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी अनेकांचे गुप्तपणे प्रयत्न चालू सतात. पण यावर एक साधा घरगुती उपाय आहे.
 
योगासनांच्या माध्यमातून पौरुषत्व वाढवता येतं. यासाठी कुठलंही कठीण आसन करण्याची गरज नाही. ब्रह्मचर्यासन नामक एक अत्यंत सोपं आणि प्रभावी आसन आहे. हे आसन रात्री जेवणानंतर आणि झोपण्याआधी करावं. यासाठी जमिनीवर एक आसन मांडून त्यावर दोन्ही पाय अशा रितीने पसरावे की जेणेकरून नितंबांचा आणि गुदेचा जमिनीला स्पर्श होईल. यानंतर हात गुडघ्यावर ठेवून शांत मनाने साधारण ५ मिनिटं बसून राहावे. हे आसन करायला अत्यंत सोपं आहे आणि हे काही वेळात पूर्ण होते. मात्र हे आसन करताना धसमुसळेपणा करू नये. हे आसन जमत नसल्यास थोडा प्रयत्न करा. मात्र जोर देवून ते आसन करायचा प्रयत्न करू नका.
 
या आसनामुळे स्वप्नदोषासारखे विकार नष्ट होतात. पौरुषत्वात वाढ होते. वीर्यवहन वोढतं आणि उष्णता कमी होते. त्यामुळे शरीरही तेजस्वी बनते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरच्या घरी बनवा Immunity Booster Juice, जाणून घ्या रेसिपी