काळजी किंवा धास्ती घेणं म्हणजे काय?
एखादी कोणतीही गोष्ट होणं किंवा होण्याची शक्यता घेउन स्वतःला त्रास करून घेणं, किंवा त्यासाठीची भीती बाळगणं. एक घाबरलेला व्यक्ती तणावात राहून सहजच काळजीत पडू शकतो.
धास्ती घेण्याचे किंवा घाबरण्याचे लक्षण काय आहे?
श्वासोच्छ्वास वेगानं होणं, घाम फुटणं, कापरं भरणं, स्नायूंमध्ये ताण येणं, अंधुक दृष्टी होणं, श्वास घ्यायला त्रास होण्यासारखं जाणवणं हे महत्वाचे लक्षणे आहेत.योगाने किंवा व्यायामाने काळजी किंवा भीतीवर उपचार सहज शक्य आहे.
जर का आपण काळजी, भीतीने किंवा नैराश्याने ग्रस्त असाल तर या योग क्रियेचा किंवा या काही व्यायामाचा सराव करावा.
* अनुलोम -विलोम
हा व्यायाम केल्यानं रक्त विसरणं चांगलं होतं, संसर्गाला दूर करण्यास मदत करतं.
* नाडी शोधन प्राणायाम
हा व्यायाम केल्यानं मन शांत आणि एकाग्र होतं. दररोज याचा सराव केल्यानं काळजी दूर होते.
* चंद्रभेदी प्राणायाम
हा व्यायाम केल्यानं झोप न येण्याची समस्या पासून सुटका होते. तसंच मानसिक शांतीसाठी दररोज दररोज चंद्रभेदी प्राणायाम करावा.
* पश्चिमोत्तानासन
काळजी वाळजी राहील दूर, मन मेंदूला ठेवणार हा कूल. हा व्यायाम केल्यानं मन आणि मेंदू शांत राहतं आणि काळजी दूर होते.
* मत्स्यासन
हा व्यायाम केल्यानं शरीर आणि मनामध्ये व्यवस्थितरीत्या संतुलन राहतं. काळजी नाहीशी होते.
* शशांकासन
हा व्यायाम केल्यानं मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतं, दररोजच्या सरावाने मानसिक आजार देखील दूर होतात.
* भुजंगासन
हा व्यायाम केल्यानं मणक्याचे हाड बळकट होऊन नैराश्य दूर होतं, या भुजंगासनाने भीती किंवा धास्ती दूर होते.
* वृक्षासन
हा व्यायाम केल्यानं शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतील, कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य असणारा व्यायाम.