Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Adhik Maas : अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व

Adhik Maas : अधिकमासाविषयी माहिती आणि महत्त्व
, मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (17:39 IST)
हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक प्राणी पाच घटकांपासून बनलेला आहे. या पाच घटकांमध्ये पाणी, अग्नी, आकाश, हवा आणि पृथ्वी यांचा समावेश आहे. आपल्या स्वभावानुसार हे पाच घटक प्रत्येक जीवाचे कमीत कमी स्वरूप निर्धारित करतात. अधिक महिन्यात सर्व धार्मिक कृत्ये चिंतन, ध्यान, मनन, योगाद्वारे साधक आपल्या शरीरात असलेल्या या पाच घटकामध्ये संतुलन साधण्याचे प्रयत्न करतात. 
 
या संपूर्ण महिन्यात आपल्या धार्मिक आणि अध्यात्मिक प्रयत्नांद्वारे प्रत्येक माणूस आपल्या शारीरिक आणि अध्यात्मिक प्रगती आणि पावित्र्यता ठेवण्यासाठी सज्ज असतो. अश्या प्रकारे अधिक महिन्यात केलेल्या प्रयत्नाने माणूस दर तीन वर्षांनी स्वतःला बाहेरून स्वच्छ करून पावित्र्य होऊन एका नवीन ऊर्जेने भरून जातो. असे मानले जाते की या दरम्यान केलेल्या प्रयत्नांमुळे कुंडलीतील सर्व दोष ही दूर होतात.
 
हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते. परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.
 
चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.
 
या अधिकमासात वर्ज्य असलेली कृत्ये - देव प्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा, विशेष मंगलमय कार्ये.
 
या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात ). म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरती हनुमंताची