पुन्हा करा प्रयत्न कौन बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशनची ही आहे तारीख

मंगळवार, 16 एप्रिल 2019 (19:14 IST)
कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाची हुकुमत, अर्थात बिग बी अमिताभ बच्चन. मागील १० सीजन पासून  रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा नुकतीच करण्यात आली. या सिझनचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे ला रात्री नऊ वाजल्यापासून करता येणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आशा सोडू नका असेही ते म्हणताना दिसत आहेत. या आगोदर शाहरुख खान याने हा शो होस्ट केला होता मात्र अमिताभ यांच्या सारखे वलय त्याला प्राप्त झाले नाही, नंतर पुन्हा एकदा अभिताभ बच्चन यांना हा शो होस्ट करयला लावले आहे. आता ११ सीजन सुरु होणार असून कोण हा सीजन जिंकतो आणि कोण लाखो रुपये जिंकणार आहे हे आपण सर्वाना लवकरच कळणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अक्षय कुमार, दीपिका पदुकोण आणि आलिया भट भारतीय नागरिक नाहीत मतदान करू शकणार नाही