Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री बल्लाळेश्र्वर

ballaleshwar
अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्र्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्तीपायी त्याचे वडील कल्याणीशेठ व गावकरयांनी त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राम्हणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून येथील गणपती बल्लाळेश्वर नावाने प्रसिध्द झाला. 

या गणपतीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे अष्टविनायकांत या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे.

जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिरयांपासून बनवले आहेत.

जाण्याचा मार्ग :

हे देऊळ पाली या गावी असून पुण्यापासून 110 किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Paneer Coconut Ladoo केवळ 15 मिनिटात तयार होतील लाडू