Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PAK vs HK : पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात करो या मरोचा सामना

PAK vs HK : पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात करो या मरोचा सामना
, शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (16:03 IST)
PAK vs HK : पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आशिया चषक 2022 चा 6 वा सामना आज शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.दोन्ही संघांसाठी हा करो किंवा मरो चा सामना आहे.शारजाह जिंकणारा संघ भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेसह सुपर-4 मध्ये स्थान मिळवेल.या आवृत्तीत पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये आतापर्यंत 1-1 सामने झाले असून दोन्ही संघांना भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे.भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला तर हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव झाला
 
पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया चषक 2022 सामना 6 शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजी शहारझा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. 
विविध स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप 2022 6 वी सामना थेट पाहू शकता
 
पाकिस्तान संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद हसनैन, हरिस रौफ, शाहनवाज दहनी
 
हाँगकाँग  संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
निजाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, झीशान अली, स्कॉट मॅककेनी, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हणतात