Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

2022 मध्ये या 6 राशींवर राहुची असेल वाकडी नजर

2022 मध्ये या 6 राशींवर राहुची असेल वाकडी नजर
, मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (22:33 IST)
नवीन वर्ष 2022 मध्ये राहू अनेक राशींवर प्रभाव टाकेल. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नंतर राहु हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनीच्या प्रभावाची तुलना राहूच्या प्रभावाशी केली जाते. राहू कोणत्याही राशीत दीड वर्ष राहतो, त्यानंतर तो एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. नवीन वर्षात राहूचे राशी परिवर्तन १२ एप्रिल रोजी सकाळी १०.३६ वाजता होईल. जाणून घ्या कोणत्या राशींवर राहूचा प्रभाव राहील-
1. मेष- मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यात राहू राशीच्या दुसऱ्या भावात प्रवेश करेल. राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. या काळात धनहानी होऊ शकते. बोलण्यात कडवटपणा येऊ शकतो, ज्यामुळे तुमचे जवळचे लोक दुखावतील.
2. वृषभ- राहु तुमच्या राशीत राहील. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हरवल्यासारखे वाटेल. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. राहू गोचरदरम्यान तुमचे पैसे अनावश्यकपणे खर्च होऊ शकतात. 
3. कर्क- राहू दहाव्या भावात म्हणजेच कर्क राशीच्या लोकांसाठी कर्म भावात प्रवेश करेल. त्यामुळे नोकरीत तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तथापि, नोकरी मिळणे कठीण आहे. नोकरीतही स्थान बदलण्याची शक्यता आहे.
4. कन्या- राहु तुम्हाला 2022 मध्ये नवव्या भावात प्रवेश करेल. या दरम्यान तुमचा उच्च अधिकार्यांनशी वाद होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दुखापत होण्याचीही शक्यता असते.
5. वृश्चिक- राहु सातव्या भावात म्हणजेच वृश्चिक राशीच्या जीवन जोडीदाराच्या घरामध्ये प्रवेश करेल. या दरम्यान जोडीदाराशी वाद होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळू शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी ज्येष्ठांचा सल्ला घेणे चांगले.
6. धनु- वर्षाच्या सुरुवातीला राहू धनु राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करेल. या काळात तुमच्या आयुष्यात काही कायदेशीर अडचणी येऊ शकतात. एप्रिलच्या मध्यात राहू तुमच्या पाचव्या भावात प्रवेश करेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रतिकूल असू शकतो.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Astrology: तुमच्या कुंडलीवरून जाणून घेऊ शकता की भूतकाळात तुम्ही कोण होते?