पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घेतला आहे. आता खातेधारकांना 40 हजार रूपये काढता येणार आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेऊन, पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शक्तिकांत दास यांनीही ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं.
पीएमसी बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर तीनवेळा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली होती. आधी केवळ एक हजार रूपये काढता येत होते. त्यानंतर 10 हजार, 25 हजार आणि आता 40 हजारांपर्यंत मर्यादा वाढवलीय.
नव्या मर्यादेमुळं 77 टक्के ग्राहक पीएमसी बँकेतून आपले पैसे काढू शकतील, असा दावा आरबीआयनं केलाय.