Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही ई बाईक मिळणार डाऊन पेमेंट न करता हप्त्याने, मायलेज देणार एक चार्ज मध्ये १५६ किमी

ही ई बाईक मिळणार डाऊन पेमेंट न करता हप्त्याने, मायलेज देणार एक चार्ज मध्ये १५६ किमी
, गुरूवार, 29 ऑगस्ट 2019 (10:09 IST)
दुचाकी बनवणाऱ्या कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या असून,  कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता. Revolt RV 300 या बाईकसाठी तुम्हाला महिन्याला फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील (Revolt E-Bike Easy EMI). तर RV 400 साठी 3,499 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी दर महिन्याला 3,999 रुपये द्यावे लागेल.
 
हे सर्व ईएमआय तुम्हाला 37 महिन्यांपर्यंत भरावे लागणार आहेत. तर यासाठी कुठल्याही प्रकारचा डाऊन पेमेंट द्यावा लागणार नाही. तसेच, गाडी घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच ग्राहक या गाडीचा मालक असणार आहे.
 
दुचाकी कंपनी Revolt ने भारतात दोन इलेक्ट्रिक बाईक (e-Bike) Revolt RV 400 आणि Revolt RV 300 लाँच केल्या आहेत. कंपनीने या बाईक एका अनोख्या पेमेंट प्लॅनसोबत लाँच केल्या. या प्लॅननुसार तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये या बाईक घरी आणू शकता. Revolt RV 300 या बाईकसाठी तुम्हाला महिन्याला फक्त 2,999 रुपये द्यावे लागतील (Revolt E-Bike Easy EMI). तर RV 400 साठी 3,499 रुपये आणि टॉप मॉडेलसाठी दर महिन्याला 3,999 रुपये द्यावे लागेल. फुल्ल चार्ज झाल्यावर Revolt RV300 इक्ट्रिक बाईक 80 ते 150 किलोमीटरपर्यंत धावू शकते. Revolt RV400 ई-ईकमध्ये 3kW ची मोटार आणि 3.24kW लिथीअम आयन-बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फुल्ल चार्ज झाल्यावर ही गाडी 156 किलोमीटरपर्यंत धावेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समुद्रात मिळत नाहीये पापलेट मासा, मच्छीमार हैराण