कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. कोरोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. कोरोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी 14 एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
कोरोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर 14 एप्रिलनंतर आपण भीमजयंती साजरी करूया. त्या आधी करोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा, असंही ते म्हणाले आहेत.