Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रिमंडळ विस्तार: अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ - LIVE

मंत्रिमंडळ विस्तार: अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ - LIVE
, सोमवार, 30 डिसेंबर 2019 (13:21 IST)
सरकार स्थापनेला जवळपास महिना उलटून गेल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होतोय.
 
मुंबईस्थित विधान भवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या 35 मंत्र्यांची यादी राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचंही नाव आहे.
 
9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
 
पाहा ताजे अपडेट्स -
1 वाजून 10 मिनिटं- धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं आहे.
 
धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा परळीमधून पराभव केला होता.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील तसंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
1 वाजून 4 मिनिटं- अजित पवार उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाईल, याची उत्सुकता आहे.
 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं असलं तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र मंत्रीमंडळ विस्तारातून वगळण्यात आलं.
 
12 वाजून 52 मिनिटं- संजय राऊतांची अनुपस्थिती
शिवसेना खासदार संजय राऊत हे या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीयेत. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय राऊत नाराज असल्याची चर्चा होती. मात्र ANI शी बोलताना संजय राऊत यांनी आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे.
 
आम्ही पक्षाकडून मागणारे नसून पक्षाला देणारे आहोत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
 
12 वाजून 30 मिनिटं- नेते-कार्यकर्त्यांची गर्दी
विधान भवनाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी संभाव्य मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्तेही शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत.
 
भाजपनं या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
 
11 वाजून 39 मिनिटं - सोहळ्याचं आमंत्रण नसल्यानं राजू शेट्टी नाराज
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांना या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण नसल्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
 
एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलं, की सत्तास्थापनेच्या चर्चेमध्ये मित्र पक्षांना सन्मानं वागवलं गेलं. मात्र आता सत्ता स्थापन झाल्यानंतर मित्र पक्षांचा विसर पडला आहे. किमान समान कार्यक्रम तयार करत असतानाही आमचे मुद्दे विचारात घ्या, असं आम्ही म्हटलं होतं.
 
पण तेव्हाही आमचं मत विचारात घेतलं गेलं नाही. भाजप नीट वागलं नाही म्हणून आम्ही त्यांची सोबत सोडली. आता हे नीट वागत नसतील तर त्यांच्यामागे फरपटत जावं, असं नाही.
 
11 वाजता- आज होणाऱ्या कार्यक्रमात कोण घेणार शपथ?
पक्ष नेते खातं
काँग्रेस अशोक चव्हाण (कॅबिनेट)
काँग्रेस के.सी.पाडवी (कॅबिनेट)
काँग्रेस विजय वडेट्टीवार (कॅबिनेट)
काँग्रेस अमित देशमुख (कॅबिनेट)
काँग्रेस सुनील केदार (कॅबिनेट)
काँग्रेस यशोमती ठाकूर (कॅबिनेट)
काँग्रेस वर्षा गायकवाड (कॅबिनेट)
काँग्रेस अस्लम शेख (कॅबिनेट)
काँग्रेस सतेज पाटील (राज्यमंत्री
काँग्रेस विश्वजित कदम (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिक (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाड (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र शिंगणे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस राजेश टोपे (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब पाटील (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख (कॅबिनेट)
राष्ट्रवादी काँग्रेस आदिती तटकरे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेस प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेस दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेस संजय बनसोडे (राज्यमंत्री)
शिवसेना आदित्य ठाकरे (कॅबिनेट मंत्री)
शिवसेना गुलाबराव पाटील
शिवसेना उदय सामंत
शिवसेना अनिल परब
शिवसेना संजय राठोड
शिवसेना दादा भुसे
शिवसेना शंभूराजे देसाई (राज्यमंत्री)
शिवसेना संदीपान भुमरे
शिवसेना राजेंद्र पाटील-यड्रावकर (राज्यमंत्री)
शिवसेना अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
प्रहार जनशक्ती पक्ष बच्चू कडू (राज्यमंत्री)
अपक्ष शंकरराव गडाख
शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी भास्कर जाधव, अब्दुल सत्तार यांच्या नावाचीही चर्चा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेव्हीने फेसबुकवर बंदी घातली, सैनिकांना स्मार्टफोन वापरण्यासही बंदी घालण्यात आली