Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना लस : पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये - अदर पूनावाला

कोरोना लस : पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये - अदर पूनावाला
, मंगळवार, 12 जानेवारी 2021 (16:15 IST)
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या 'कोव्हिशिल्ड' या कोरोनावरील लशीच्या एका डोसची किंमत 200 रुपये असेल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मालक अदर पूनावाला यांनी ही माहिती एएनआय वृत्तसंस्थेला दिली.
 
अदर पूनावाला लशीच्या किंमतीबाबत म्हणाले, "कोरोनावरील लशीच्या पहिल्या 10 कोटी डोसची प्रत्येकी किंमत 200 रुपये आहे. मात्र, ही किंमत केवळ भारत सरकारसाठी त्यांच्या विनंतीवरून ठरवण्यात आलीय. आम्हाला सर्वसामान्य माणसं, गरीब आणि आरोग्य क्षेत्रातील लोकांना आधार द्यायचाय. त्यानंतर खासगी बाजारात डोसमागे 1000 रुपये आकारलं जाईल."
 
"भारत सरकारसाठी आम्ही किफायतशीर किंमत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ती 200 पेक्षाही जास्त असेल. कारण तेवढा आमचा खर्च झालाय. पण आम्हाला यातून फायदा पाहायचा नाहीय. पहिल्या 10 कोटी डोससाठी देश आणि भारत सरकारला आधार द्यायचाय," असं पूनावाला म्हणाले.
 
सीरम इन्स्टिट्यूटमधून लस मिळावी म्हणून जगभरातील अनेक देशांनी भारत आणि पंतप्रधान कार्यालयाशी लिखित संपर्क साधल्याची माहितीही अदर पूनावाला यांनी दिली.
 
"आम्ही आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये लशीचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास सर्वच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून सगळ्यांचं समाधान होईल," असं पूनावाला म्हणाले.
 
अदर पूनावाला यांच्या माहितीनुसार, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला कोरोनावरील लशीचे सात ते आठ कोटी डोस तयार केले जातील. भारतात आणि परदेशात कशाप्रकारे पुरवठा केला जाईल, याबाबत सध्या नियोजन सुरू आहे.
 
लशीच्या वाहतुकीसाठी खासगी कंपन्यांचे ट्रक, व्हॅन आणि कोल्ड स्टोरेज यांच्याशी सीरम इन्स्टिट्यूटनेच भागीदारी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुर्कीच्या मुस्लिम धार्मिक नेत्याला 1075 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली, 1000 गर्लफ्रेंडसोबत घालवत होता आपले जीवन