राज्यामध्ये 27 मार्च रोजी 35,726 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 03 हजार 475 एवढी झाली आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 26 लाख 73 हजार 461 एवढी झाली आहे.
राज्यात शनिवारी (27 मार्च) 14,523 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे 166 मृत्यूंची नोंद झाली.
मुंबईमध्ये शुक्रवारी 6130 नवीन रुग्णांची नोंद झाली.
पुणे महापालिका क्षेत्रात 3522 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 2675 रुग्णांची नोंद झाली.
नाशिक महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. इथे शुक्रवारी 2422 रुग्णांची नोंद झाली.
राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 86.58% आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट कमी होताना दिसतोय.
सध्या महाराष्ट्रात 3 लाख 03 हजार 475 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 54 हजार 073 वर पोहोचला आहे.