पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला नाही. पण ३० मार्चपर्यंत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. पुढील सहा-सात दिवसांत पुण्यातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा कडक इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
पुण्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार?
रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार
नियमांचे पालन केले नाही तर १ एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील.
लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद
उद्यान, बाग बगीचे फक्त सकाळीच सुरू राहणार
मॉल, मार्केट, चित्रपटगृह क्षमतेच्या ५० टक्केच सुरू राहणार
सार्वजनिक वाहतूक सुरूच राहणार
हॉटेलमध्ये फक्त ५० टक्के उपस्थितीला परवानगी
हॉटेलात जेवण करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय वापरण्याच्या सूचना