rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती : अजित पवार

Those who are vaccinated would not have been vaccinated: Ajit Pawar
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (17:04 IST)
पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना एका पत्रकाराने तुम्ही लस घेतली का असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये उत्तर देताना, “होय रे बाबा, मी लस घेतली आहे. मला इतरांसारखा लस घेताना फोटो काढायचा नव्हता. अशी नौटंकी मला आवडत नाही,” असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
 
लसीसंदर्भात अजित पवारांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अगदी मिश्कील शब्दामध्ये एक टोलाही लगावला. “इतरांनी फोटो टाकल्यानंतर अनेकांनी ती लस घेतली. मी जर लस घेताना फोटो काढला असता तर जे लस घेणारे आहेत त्यांनी पण लस घेतली नसती”, असं अजित पवार यांनी म्हणताच सर्वजण हसू लागले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसेकडून भोजपुरी भाषेत बॅनर्स , पक्षात सामील होण्याचे केले आवाहन