Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरस : INS आंग्रे - मुंबईत भारतीय नौदलाच्या तळावरील 21 नौसिका कोव्हिड-19 पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस : INS आंग्रे - मुंबईत भारतीय नौदलाच्या तळावरील 21 नौसिका कोव्हिड-19 पॉझिटिव्ह
, शनिवार, 18 एप्रिल 2020 (14:51 IST)
भारतीय नौदलालाही आता कोरोना व्हायरसने ग्रासल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतीय नौदलाच्या INS आंग्रे तळावरील 20 नौसैनिकांची कोव्हिड-19ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मुंबईच्या किनाऱ्यावर नौदलाचा INS आंग्रे हा तळ आहे. INS आंग्रेवरून पश्चिम नौदल कमांडच्या ऑपरेशन्ससाठी रसद पुरवली जाते.
7 एप्रिलला याच तळावर पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी घेण्यात आली होती असं नौदल अधिकाऱ्यांनी सांगितलं.
"7 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळलेली नाहीत. ते राहत असलेला लिव्हिंग ब्लॉक क्वारंटाईन करण्यात आला असून, कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे, आणि लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
"कोरोनासंदर्भात केंद्र सरकार तसंच आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यवाही करण्यात आली आहे. जहाजावर तसंच पाणबुडीवर कार्यरत कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नाही," असं नौदलाने स्पष्ट केलं आहे.
मात्र इतर कुठल्या जहाजावर किंवा पाणबुडीवर हा संसर्ग आढळला नसल्याचं नौदलाने स्पष्ट केलं आहे. गेल्याच आठवड्यात नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी आपली जहाजं आणि पाणबुड्या विषाणूमुक्त ठेवणं गरजेचं आहे, असं विधान केलं होतं.
याआधी भारतीय लष्करातील आठ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. यापैकी दोन डॉक्टर आणि एका नर्स यांनाही संसर्ग झाल्याचं लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी सांगितलं होतं.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात नसलेल्या जवानांना त्यांच्या युनिटमध्ये परत बोलावण्यात आलं आहे. त्यासाठी बेंगळुरू ते जम्मू आणि बेंगळुरू ते गुवाहाटी अशा दोन विशेष रेल्वे चालवण्यात येत आहेत.
भारताच्या कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यात भारतीय लष्कर, वायुदल तसंच नौदल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी त्यांच्या तळांवर क्वारंटाईन सेंटर आणि आयसोलेशन वॉर्ड उभारले आहेत.

'INS आंग्रे' तळ कुठे आणि कसा आहे?

ज्या नौसैनिकांची कोव्हिड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली, ते सगळेजण मुंबईतील फोर्टस्थित नेव्हल बेस डॉकयार्डच्या कॅम्पसमध्ये राहतात. इथे सगळे अविवाहित नौसैनिक राहतात.
INS आंग्रेवरून पश्चिम नौदल कमांडच्या ऑपरेशन्ससाठी रसद पुरवली जाते.
हा तळ पाहिलेल्यांच्या माहितीनुसार, "INS आंग्रेमध्ये 650 ते 750 नौसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. नौदलाच्या भाषेत याला 'इन-लिव्हिंग ब्लॉक' म्हटलं जातं."
विशेष म्हणजे या ठिकाणी इतर हॉस्टेलसारखं प्रत्येक खोलीत किचन नाहीय. त्यामुळं एकाच ठिकाणी आळीपाळीनं इथले नौसैनिक जेवण बनवतात आणि एकत्र येऊन जेवतात. स्वच्छतागृहाचंही तसंच आहे. कॉमन वॉशरुम हा प्रकार इथं आहे.
दरम्यान, अमेरिकेतही असाच प्रकार उघडकीस आलाय. अमेरिकेतील नौदलाचं युद्धनौका 'थियोडोर रुझवेल्ट'ही कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलीय. या युद्धनौकेवरील 100 हून अधिक नौसैनिकांना लागण झालीय. त्यानंतर अमेरिकेनं दोन हजाराहून अधिक नौसैनिकांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whatsapp लवकरच नवीन फीचर बाजारात आणणार आहे, चारहून अधिक वापरकर्ते ग्रुप व्हिडिओ कॉल करण्यास सक्षम असतील