Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषित होणार तारखा

webdunia
शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (10:33 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात आज दुपारी 12 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभांच्या निवडणुका घोषित होणार आहेत.
 
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेची मुदत संपणार आहे. गेल्या वेळी 18 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली होती. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
 
विधानसभेसाठी एकूण किती जागा आहेत?
2014 साली राज्यात 8 कोटी 25 लाख मतदार होते. 15 ऑक्टोबर 2014 रोजी एकाच टप्प्यात राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या होत्या.
 
चारच दिवसानंतर म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक म्हणजेच 122 जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या.
 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या.
 
लोकसभा 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या पण निवडणुकीनंतर त्यांनी एकत्रपणे सरकार स्थापन केलं.
 
विधानसभेसाठीची राजकीय समीकरणं
विधानसभा निवडणुकीत प्रमुख लढत ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना युती अशी असेल असं सध्यातरी दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समान जागावाटपावर एकमत झालं आहे. एमआयएम पक्षानं वंचित बहुजन आघाडीची साथ सोडून स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपविरुद्ध प्रचार करणारे राज विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत जाणार का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबद्दल राज किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीनं उघडपणे कोणतंही भाष्य केलं नसलं, तरी या राजकीय समीकरणाकडे विधानसभेच्या वेळेस सर्वांचच लक्ष असेल.
 
या पक्षांव्यतिरिक्त बहुजन विकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष यांचीही भूमिका महत्त्वाची राहील.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय