Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 14 March 2025
webdunia

लोकसभा निवडणूक : अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना खरंच दुर्गा म्हणाले होते का?

लोकसभा निवडणूक : अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधींना खरंच दुर्गा म्हणाले होते का?
, शुक्रवार, 12 एप्रिल 2019 (17:26 IST)
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा देवीशी केली होती असं विधान अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.
 
ते म्हणाले, "आपले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये इंदिरा गांधी यांची दुर्गा देवीशी तुलना केली होती. यामुळे इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेकडे सर्वांचे लक्ष गेलेच त्याहून 
 
आपल्यापेक्षा विरोधी मत मांडणाऱ्या वाजपेयी यांचा मोठेपणाही दिसून आला."
 
भाजपामध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सिन्हा यांनी हे विधान केले आहे. भाजपाने पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघामध्ये सिन्हा यांच्याऐवजी रवीशंकर प्रसाद यांना 
 
तिकीट दिल्यानंतर मार्च महिन्यामध्ये सिन्हा यांनी भाजपाला रामराम केला.
 
2009 आणि 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सिन्हा याच मतदारसंघातून विजयी झाले होते. काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या नवी दिल्लीमधील मुख्यालयात 
 
त्यांनी पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह पत्रकार परीषद घेतली. आम्हाला त्यांनी केलेलं विधान दिशाभूल करणारं असल्याचं आढळलं. अशा प्रकारचा दावा पहिल्यांदाच करण्यात आला 
 
आहे असं नाही. बांगलादेशात 1971 साली भारतीय लष्कराने हस्तक्षेप केल्यानंतर वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांची दुर्गादेवीशी तुलना केली होती असा दावा यापूर्वी अनेकांनी केला आहे.
 
वाजपेयी यांनी फेटाळला होता दावा
इंडिया टिव्हीवरील रजत शर्मा यांच्या "आपकी अदालत" या कार्यक्रमात त्यांनी हे दावे फेटाळून लावले होते.
 
तुम्ही इंदिरा गांधी यांची दुर्गादेवीशी तुलना केली होती? या रजत शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वाजपेयी म्हणाले होते, " मी कधीही इंदिरा गांधी यांचा उल्लेख दुर्गा असा केला नाही. हे 
 
काहीतरी माध्यमांनी प्रसिद्ध करायचं ठरवलं होतं. मी त्यांना दुर्गा कधीच म्हणालो नाही हे मी अनेकदा सांगत राहिलो. आणि मी तसं म्हणाल्याचं ते म्हणत राहिले. त्यानंतर त्यावर खूप संशोधन 
 
झालं.
 
पुपुल जयकर इंदिरा गांधीं यांच्या जीवनावर पुस्तक लिहित होत्या तेव्हा त्यांनी याबाबत मला विचारलं होतं. मी नाही म्हणालो, मी कधीच असं म्हणालो नव्हतो. तेव्हा त्यांनी ग्रंथालयांमधील सर्व 
 
पुस्तकं शोधली. पण त्यांना मी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटल्याचा पुरावा त्यांना कोठेही सापडला नाही. पण या दुर्गा संबोधनानं माझा पिच्छा काही सोडला नाही. बघा आजही तुम्ही विचारत 
 
आहातच की..." ही मुलाखत इंडिया टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब पेजवर नोव्हेंबर 2014 मध्ये प्रसिद्ध झाली आहे. वाजपेयी यांनी हा दावा फेटाळला असला तरी सोशल माध्यमांमध्ये ते वारंवार येतंच 
 
राहिलं.
 
2019मध्येही करण्यात आले होते असेच दावे
13 जानेवारी रोजी जंतरमंतर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी घेतलेल्या सभेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी त्याचा पुनरुच्चार केला.
 
ते म्हणाले होते, "आम्हाला पराभूत करता येईल असा विचार करणाऱ्यांनी देशातील लोकशाही वाचविण्यासाठी लोक एकत्र येतात हे विसरू नये. एकेकाळी रा. स्व. संघाने इंदिरा गांधींची तुलना 
 
दुर्गेशी केली होती. अटलबिहारी वाजपेयी त्यांना दुर्गा असे संबोधित केले होते. पण त्यांचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. त्यामुळे कोणत्याही भ्रमात राहू नका. यादेशातील लोक जेव्हा ठरवतात 
 
तेव्हा ते साध्यही करतात."
 
त्यांचं विधान समाजमाध्यमांवरील काँग्रेसप्रणित पेजेसवर आणि व्हॉटस्अपवर मोठ्या प्रमाणात शेअर झालं होतं. असं विधान करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी येचुरी यांनी त्याचा पुनरुच्चार 
 
केला आणि संघाला त्याच्याशी जोडलं. रा. स्व. संघाचे नियतकालिक ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, "रा. स्व. संघाने इंदिरा गांधी यांची दुर्गेशी कधीही तुलना 
 
केली नाही. पण संघानं त्यांच्या बांगलादेशविषयक धोरणाला नक्कीच पाठिंबा दिला होता."
 
दावाः अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांची दुर्गा देवीशी तुलना केली, असे विधान शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. पण आम्हाला हे विधान दिशाभूल करणारं असल्याचं आढळलं.
 
दावा करणारे- शत्रुघ्न सिन्हा
सत्यता- हे विधान असत्य आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले : आठवले