इंदिरा गांधी या त्यांच्या काळातील सर्वात सक्षम नेत्या हे वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे असून भाजप नेते नितीन गडकरी यांनी वक्तव्य केले आहे.
नागपूरमध्ये झालेल्या स्वयंसेविकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्त्री सक्षमीकरणाचे उदाहरण देताना इंदिरा गांधी यांचे नाव घेतले. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या बळावर सत्ता काबीज केली. त्या त्यांच्या काळातील अनेक पुरुष नेत्यांपेक्षाही सक्षम नेत्या होत्या असे म्हणत नितीन यांनी इंदिरा गांधी यांचे कौतुक केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायमच इंदिरा गांधी यांच्यावर टीका करत असतात. त्यांच्या योजनांना नावं ठेवत असतात. अशात आता नितीन गडकरी यांनी घेतलेली भूमिका अगदीच वेगळी आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा गडकरींच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे .
या आगोदर अनेक वक्तव्य आणि आता हे नवीन विधान यामुळे गडकरी पुन्हा चर्चेत आले आहे. अनेकांनी त्यांना पंतप्रधान बनवा अशी मागणी देखील केली आहे.