Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

बॉस पादतो म्हणून त्याने दाखल केलेला खटला कोर्टाने फेटाळला

बॉस पादतो म्हणून त्याने दाखल केलेला खटला कोर्टाने फेटाळला
ऑस्ट्रेलियातील एका कामगाराने त्याचा माजी बॉस वारंवार त्याच्याकडे पार्श्वभाग करून पादायचे असा आरोप करत खटला दाखल केला. मात्र अशा प्रकारचा कोणताही छळ होत नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
 
डेव्हिड हिंग्स्ट यांच्या मते त्यांचे माजी सहकारी ग्रेग शॉर्ट पार्श्वभाग वर करून त्यांच्या दिशेने पादायचे. असं ते दिवसातून सहा वेळा करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी कंपनीवर 1.8 मिलियन डॉलरचा दावा ठोकला होता. पण कोर्टाने असा कोणताही छळ झाला नसल्याचा निर्णय देत, हा दावा फेटाळला होता. या सगळ्या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मन:स्ताप झाल्याचा डेव्हिड यांचा दावा आहे.
 
तो पादायचा आणि निघून जायचा
 
हिंग्सट मेलबर्नमध्ये असलेल्या एका कंपनीवर 2017मध्ये खटला दाखल केला. पण हा खटला एप्रिल 2018मध्ये रद्द करण्यात आला होता. आता त्यांनी या निर्णयाविरुद्ध अपील केलं.
 
"मी भिंतीकडे तोंड करून बसायचो. ते माझ्या खोलीत यायचे. ती खोली लहान होती आणि त्याला खिडकी नव्हती,"असं डेव्हिड यांनी ऑस्ट्रेलियन असोसिएटेड प्रेसला सांगितलं. "ते तिथं येऊन पादायचे आणि निघून जायचे. असं ते पाच सहा वेळा करायचे," ते पुढे सांगत होते.
 
मूळ सुनावणीच्या वेळी शॉर्ट यांनी असं काही केल्याचं आठवत नसल्याचं सांगितलं. एखादं-दोनदा झालं असेल असं ते म्हणाले. मात्र काही विशिष्ट उद्देशाने असं काही केल्याचा किंवा डेव्हिडला छळण्याच्या दृष्टीने असं काही केल्याचा शॉर्ट यांनी इन्कार केला. डेव्हिड यांच्या मते शॉर्ट यांच्या अंगाला वासही यायचा. म्हणून अनेकदा ते डिओड्रंटही शिंपडायचे.
 
news.com.au या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार शॉर्ट यांना डेव्हिड यांच्यापासून सुटका हवी होती अशा पद्धतीची वागणूक होती. शॉर्ट यांच्या अशा वागणुकीमुळे डेव्हिड यांना प्रचंड मन:स्ताप झाला. त्यांनी अनेकदा शिवीगाळ केली, फोन करून छळ केल्याचा आरोप केला आहे.
 
डेव्हिड यांच्या मते सुनावणी योग्य पद्धतीने झाली नाही. तसंच त्यांची केस हाताळणाऱ्या न्यायाधीशांनी भेदभाव केला असाही आरोप केला.
 
मात्र न्यायाधीशांनी या आरोपाचा इन्कार केला आणि त्यांना बाजू मांडण्याची बरीच संधी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अपील कोर्टाने ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय अबाधित ठेवल्याचं वृत्त सीएनबीसी शिकागो या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वर्धा : मावळच्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचे आदेश पवार कुटुंबानं दिले - मोदी