rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या हायकोर्टातील विचित्र शिक्षा, जाणून आपल्यालादेखील वाटेल कौतुक

MP High Court
मध्यप्रदेश हायकोर्टाच्या ग्वालेहर बॅचचे जस्टिस आनंद पाठक यांचा न्याय देण्याचा मार्ग जरा विचित्र आहे. त्यांच्या द्वारे देण्यात येत असलेली शिक्षा नैसर्गिक समृद्ध असते. आता आपण विचार कराल अशी कोणती शिक्षा? 
 
येथे करण्यात येणार्‍या अपील आणि जामीन अर्ज यांवर निघणार्‍या आदेशात शिक्षा स्वरूप असे विनम्र कार्य निर्देशित असतात जे ऐकण्यात सोपे आहे. जस्टिस आनंद पाठक गुन्हेगाराला वृक्षारोपण आणि त्यांची देखभाल करण्याचे आदेश देतात, तर काही लोकांना अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमात सेवाकार्य करण्याचे आदेश देतात. आदेशात कोर्टाचा विचार स्पष्ट लिहिलेला असतो- 'हा प्रश्न केवळ झाडं रोपण्याचे नव्हे तर एक विचार पाळण्याचे आहे.' जस्टिस पाठक यांच्या बॅचने दीड वर्षात 100 हून अधिक लोकांना अशी शिक्षा ठोठावली आहे ज्यामुळे आतापर्यंत सुमारे 500 झाडं लावली गेली आहेत.
 
काही प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना अनाथाश्रम पाठवण्यात आले. येथे सेवाकार्य करून दंड राशीत फळं आणि दूध वाटतात. अनेक लोकं या प्रकाराची शिक्षा मिळाल्यानंतर आदेशात निर्धारित मर्यादाहून अधिक कार्य करतात आणि अशा परोपकारात त्यांना मन रमून जातं.
 
कोर्टाद्वारे शिक्षा म्हणून कोणाला बाग दत्तक घेण्याचे तर काही जणांना शहरात डस्टबिन लावण्याचे आदेश देखील दिले गेले आहेत. व्यक्तीची लायकी आदेश दिले जातात.
 
कोर्टाच्या आदेशात काही लोकांना गृह मंत्रालयाच्या मोबाइल अॅप 'भारत के वीर' द्वारे शहीद कुटुंबांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश देखील दिले गेले आहेत. या प्रकारे आता पर्यंत सुमारे 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Samsung Galaxy Tab Active 2 लॉन्च, खाली पडला तरी तुटणार नाही...