लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही- अमित शाह

सोमवार, 8 जून 2020 (15:30 IST)
केवळ एका शब्दावर देशाला एक करणारा लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतंर नरेंद्र मोदींसारखा नेता पाहिला नाही असं मत अमित शाह यांनी व्यक्त केले आहे.
 
व्हर्च्युअल रॅलीद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी हाक दिल्यावर सर्व देश एकत्र आला. त्यांच्या शब्दाचा सन्मान करत संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली. काहीजण याला राजकीय प्रचार म्हणत आहेत. हा राजकीय प्रचार नसून देशाला एक करण्याची मोहीम आहे, असं शाह म्हणाले आहेत.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख भारत - चीन तणाव : चीनी उत्पादनांचा बहिष्कार करून समस्या सुटेल का?