"काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जर अमेठीतून हरले तर मी राजकारण सोडेन," असं नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं.
UPAच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायला हवा, असंही ते यावेळी म्हणाले.
यावेळी सिद्धू यांनी भाजपकडून काँग्रेसवर वारंवार होत असलेले आरोपही खोडून काढले आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळात ७० वर्षांत कोणताही आर्थिक विकास झाला नाही या भाजपाच्या आरोपावर सिद्धू म्हणाले, या काळात सुईपासून विमानांपर्यंत ज्या काही वस्तू बनवण्यात आल्या त्या या देशातच बनवल्या गेल्या होत्या.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया यांनी काँग्रेसचं सक्षमपणे नेतृत्व केलं. त्यामुळेच केंद्रात 10 वर्षं (2004 ते 2014) काँग्रेसची सत्ता कायम राहिली, असं सिद्धू म्हणाल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.