Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी
, शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (16:01 IST)
कोरोना व्हायरससंदर्भात अमेरिकेत विकसित करण्यात आलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन लशीच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (7 ऑगस्ट) दुपारी यासंबंधित घोषणा केल्याची माहिती PTI वृ्तसंस्थेने दिली आहे.
 
कोरोना व्हायरससंदर्भात अमेरिकेत विकसित करण्यात आलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन लशीच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दुपारी यासंबंधित घोषणा केल्याची माहिती PTI वृ्तसंस्थेने दिली आहे.
 
भारतात परवानगी मिळालेली ही पाचवी लस आहे. यापूर्वी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक-व्ही आणि मॉडर्ना या लशींच्या वापरास केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली होती.
 
जॉन्सन अँड जॉन्सन ही सिंगल-शॉट लस आहे. इतर लशींप्रमाणे या लशीचे दोन डोस घेण्याची गरज नाही.
 
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला परवानगी दिली होती. त्यानंतर विविध देशांमध्ये ही लस देण्यात येत आहे.
 
जॉन्सन अँड जॉन्सनची लस इतर लशींपेक्षा चांगला आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. या लशीचा साठा व्हॅक्सीन फ्रीजरऐवजी साध्या फ्रीजमध्येही करता येऊ शकतो. फक्त एकच डोस घ्यावा लागत असल्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस जगभरात लोकप्रिय ठरली होती.
 
या लशीची चाचणी अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील या देशांमध्ये सर्वप्रथम करण्यात आली. त्यानंतर जानेवारी महिन्यात या चाचणीचे परिणाम कंपनीने सार्वजनिक केले होते.
 
FDA कडे दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाविरुद्ध ही लस 85 टक्के प्रभावी आहे.
 
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या लशीला परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज 5 ऑगस्ट (गुरुवार) रोजी दाखल केला होता. त्यानंतर आज या लशीला परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे.
 
भारतात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सिंगल डोसची लस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीसोबत संयुक्तपणे मिळून ही लस बनवली जाईल. फक्त एकच डोस घेण्याचा पर्याय नागरिकांना यामुळे उपलब्ध होईल, असं कंपनीने म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप आणि मनसे युतीचा निर्णय हा अमित भाईंचा असेल : चंद्रकांत पाटील