Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मिर फाईल्स : काश्मिरी पंडितांना का आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं होतं?

काश्मिर फाईल्स : काश्मिरी पंडितांना का आपलं घरदार सोडून पळून जावं लागलं होतं?
, मंगळवार, 15 मार्च 2022 (09:06 IST)
'त्या घरांमधलं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. गॅस शेगडीवर ठेवलेली पातेली तशीच होती, स्वयंपाक घरात भांडी इकडेतिकडे पडली होती. घरांचे दरवाजे उघडे होते.
 
प्रत्येक घरात हेच दृश्य होतं. असं वाटतं होतं की इथे भूकंप आलाय आणि इथे राहाणारे घरदार सोडून पळून गेलेत. झालं ही थोडंफार असंच होतं. पण फरक इतकाच होता की कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही घरं उघड्यावर आली नव्हती. श्रीनगरच्या रैनावाडी गल्लीत रहाणाऱ्या काश्मिरी पंडितांना एका रात्रीतून घरदार सोडून पळून जावं लागलं होतं.'
 
32 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. 19 जानेवारी 1990 साली हजारो काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावं लागलं होतं.
 
बीबीसी हिंदीचे पत्रकार या घटनेनंतर वर्षभरानंतर तिथे रिपोर्टिंगसाठी गेले होते आणि तेव्हाही त्यांना अशीच अस्ताव्यस्त घरं दिसली. तिथे त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्याच शब्दात वरती मांडलं आहे.
 
काश्मिरी पंडितांचा विषय आता नव्याने चर्चेत येण्याचं कारण म्हणजे नुकताच रिलीज झालेला काश्मीर फाईल्स हा पिक्चर.
 
आपल्याच राज्यातून जीव मुठीत धरून पळून जाण्याची काश्मिरी पंडितांवर वेळ आली होती. याच विषयावर हा पिक्चर बेतलेला आहे.
 
या चित्रपटाला मुद्दाम दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं आहे. (अनेक भाजपशासित राज्यांमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे.) पण त्यांच्या सत्यातला बराचसा भाग काल्पनिक आहे, अशी टीकाही दुसरीकडे केली जातेय.
 
सिनेमाचा वाद आपण बाजूला ठेवू, काश्मिरी पंडितांचं पलायन नेमकं कसं आणि का झालं होतं, विस्थापित झालेले हे लोक नंतर कसे जगले, त्यातले कोणी परत आले का, हेच सगळं या लेखात मांडलं आहे.
 
लेखक राहुल पंडिता तेव्हा 14 वर्षांचे होते. बाहेर वातावरण वाईट होतं. ते म्हणतात, "मशिदीत आमच्या विरोधात घोषणा दिल्या जात होत्या. शेजारचे म्हणत होते की काश्मीर स्वतंत्र करायच्या आमच्या लढाईत सहभागी व्हा किंवा इथून निघून जा."
 
काश्मिरी पंडित हिंसा, कट्टरवाद, हत्या आणि भयाच्या वातावरणात जगत होते. सुरक्षा दलं या लोकांना संरक्षण देण्यासाठी असमर्थ होती.
 
राहुल पंडितांच्या कुटुंबाने तीन महिने वाट पाहिली की परिस्थिती बदलेल. पण शेवटी त्यांना घर सोडावं लागलं. "हल्ल्यांच्या भीतीने आमच्या घरात दिवे बंद केले होते."
 
राहुल पुढे म्हणतात, "काही मुलं, ज्यांच्याबरोबर आम्ही क्रिकेट खेळायचो ते आमच्या घराबाहेर काश्मिरी पंडितांच्या रिकाम्या झालेल्या घरांची आपआपसात वाटणी करण्याच्या गोष्टी करत होते. आमच्या घरातल्या मुलींबद्दल अश्लील गोष्टी बोलत होते. त्या गोष्टी मी अजूनही विसरलेलो नाही."
 
त्याच रात्री राहुल यांच्या वडिलांनी निर्णय घेतला की आता काश्मिरात राहायचं नाही. दुसऱ्याच दिवशी ते टॅक्सी करून जम्मूला निघून गेले.
 
1985 पासून काश्मीर अस्वस्थच होता. 'आझादी'चे नारे जोर धरत होते. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट, हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांचा जोर वाढलेला होता.
 
1987 साली नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला यांनी निवडणूक जिंकली पण राज्यातल्या अनेक संघटनांनी या निवडणुकीच्या निष्पक्षतेवर शंका घेतली.
 
1990 च्या जानेवारी महिन्यात जेव्हा जगमोहन यांना दुसऱ्यांदा राज्याचे राज्यपाल नेमलं गेलं तेव्हा फारुक अब्दुल्ला यांनी या नेमणुकीचा निषेध करत राजीनामा दिला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
 
काही कट्टरतावादी संघटनांनी काश्मिरी हिंदूंना हेतुपूर्वक लक्ष्य करायला सुरुवात केली होती. त्यांच्या घरांना आगी लावल्या, पुरुषांना गोळ्या घालून ठार केलं. त्यांची मंदिरंही उद्ध्वस्त केली.
 
हिवाळ्याच्या रात्रीच्या अंधारात काश्मिरी हिंदूंना घरदार सोडून पळ काढावा लागला. काश्मिरी पंडित याला वांशिक संहार मानतात. काश्मीर खोऱ्यातून निघून गेलेल्या या पंडित कुटुंबांना जम्मू, दिल्ली आणि इतर अनेक ठिकाणी आसरा घ्यावा लागला. जम्मूत अत्यंत खडतर परिस्थितीत ही कुटुंबं राहिली. तिथे तंबू आणि राहुट्या बांधून छावण्यांमध्ये त्यांना राहावं लागलं.
 
राहुल पंडितांच्या कुटुंबालाही दारोदार भटकावं लागलं. ते म्हणतात, "सुरुवातीला आम्ही जम्मूच्या एका स्वस्त हॉटेलात राहिलो. लहान-लहान जागा शोधून राहिलो. नंतर एका धर्मशाळेत राहिलो जिथे माझ्या आईची तब्येत खूप बिघडली. त्यावेळी भविष्यात फक्त अंधारच दिसत होता."
 
1990 साली ऑल इंडिया काश्मिरी समाजाचे अध्यक्ष विजय ऐमा यांचंही घर उद्धवस्त झालं.
 
ऐमा म्हणतात, "ही परिस्थिती फक्त एका कुटुंबावर ओढावली नव्हती तर संपूर्ण समाजावर ही परिस्थिती ओढावली होती. ज्यांना एका रात्रीत सगळं सोडून परागंदा व्हावं लागलं अशा काश्मिरी पंडितांची ही कहाणी आहे."
 
काश्मिरी पंडितांनुसार त्यांना फक्त घराबाहेर काढलं नाही तर मुळापासून उपटून फेकलं.
 
विजय ऐमा म्हणतात, "विश्वास बसत नव्हता की ज्या जागी आम्ही शतकानुशतकं राहात होतो तिथे असं वातावरण तयार झालं. कळत नव्हतं की आम्ही कसे जिवंत वाचू, कशी आपल्या बायकांची अब्रू वाचवू."
 
त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर, "शब्दात वर्णन करून सांगता येणार नाही अशी अवस्था झाली होती."
 
बहुतांश काश्मिरी पंडितांनी जम्मुत आश्रय घेतला. तिथे निर्वासितांचं शिबिरांचं एक शहरच वसलं. राहुल पंडिता म्हणतात की जूनच्या उन्हाळ्यात (उत्तर भारतात जून महिन्यात सर्वाधिक उष्णता असते) या शिबिरांमुळे अनेकांचा मृत्यू झाला.
 
जम्मू आणि दिल्लीत आश्रय घेणाऱ्या काश्मिरी पंडितांना वाटलं की इथले लोक त्यांची वेदना समजून घेतील, पण त्यांना लवकरच लक्षात आलं की त्यांना 'समजून घेणारं कोणी नव्हतं'.
 
राहुल पंडिता म्हणतात, "आम्हाला आशा होती की काश्मीर सोडून परागंदा झाल्यानंतर जम्मू, दिल्ली आणि लखनऊ जाऊ तर तिथे हिंदू बहुसंख्यांक आहेत. त्यांना समजेल की आम्ही काश्मीर सोडून पळून आलोय. पण निर्वासित झाल्यानंतर कळलं की जो घरमालक असतो तो ना हिंदू असतो ना मुसलमान. तो फक्त घरमालक असतो आणि त्याचा धर्म फक्त पैसा असतो."
 
काश्मिरी पंडितांची खरंतर सगळ्यांबद्दल तक्रार आहे. विजय ऐमा म्हणतात की देशाच्या सिव्हिल सोसायटीने, माध्यमांनी, नेत्यांनी आणि सरकारांनी... कोणीच त्यांची विचारपूस केली नाही.
 
एका अंदाजानुसार गेल्या 32 वर्षांत तीन लाख काश्मिरी पंडित काश्मीर खोरं सोडून गेले
 
काश्मीर का सोडलं नाही याबद्दल बोलताना ते म्हणतात, "काही अडचणी होत्या ज्यामुळे गेलो नाही आणि आपल्या मायभूमीवर असणाऱ्या प्रेमाने इथून जावंस वाटलं नाही."
 
पण काश्मीर न सोडण्याची किंमत त्यांनी आपल्या पत्नीला कायमचं गमावून चुकती केली.
 
ते म्हणतात, "ज्या दिवशी माझ्या बायकोचा खून झाला त्या दिवशी मी स्वतःला म्हटलं की काश्मीर सोडलं असतं तर माझी बायको जिवंत राहिली असती. पण छातीवर दगड ठेवून याला देवाची इच्छा समजलो आणि पुढचं आयुष्य जगायला लागलो."
 
मखन लाल यांना या गोष्टीचं शल्य आहे की त्यांच्या पत्नीची हत्या झाल्यानंतर ती कोणी केली याचा तपास आजपर्यंत झालेला नाही.
 
पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावर त्यांनी दुसरं लग्न केलं.
 
ते म्हणतात, "माझ्या हृदयात किती घाव आहेत ते माझं मला माहितेय. सगळ्यांत मोठं दुःख की माझ्या बायकोची हत्या झाली. दुसरं म्हणजे मला माझ्याच घरात राहून बेघरासारखं जगावं लागलं."
 
मखन लाल काही बोटावर मोजण्याइतक्या काश्मिरी पंडितांपैकी आहेत जे खोऱ्यात राहिले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
 
ते म्हणतात, "एकतर जेव्हा आमच्याकडे कोणाचा मृत्यू होतो तर त्याचे अंत्यविधी करण्यासाठी जम्मुहून लोकांना बोलवालं लागतं. लग्नासाठी पण अशीच अडचण होते."
 
पत्नीची हत्या झाल्यानंतर त्यांनी काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला आणि एका महिन्यासाठी जम्मूला गेलेही. पण जम्मूला पोहोचूनही त्यांना कोणी भाड्याने जागा दिली नाही त्यामुळे ते परत काश्मीरला गेले.
 
मखन लाल यांना याही गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा त्यांचा एखादा मोठा सण असतो तेव्हा त्यांना काश्मीरच्या बाहेर जावं लागतं.
 
काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये आणून त्यांचं पुर्नवसन करण्याच्या सरकारी योजनांवर टीका करताना मखन लाल म्हणतात की भारत सरकारने आधी इथल्या पंडितांचं व्यवस्थित पुनर्वसन करावं आणि मग जे परागंदा झालेत त्यांना परत आणून वसवावं.
 
त्यांचं म्हणणं आहे की, "आमची घरं मोडकळीला आलीत. ओस पडलीयेत. सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही का?"
 
काश्मीर सोडून गेलेल्या अनेक काश्मिरी पंडितांना परत राज्यात परत यायचं आहे. पण हे शक्य आहे का?
 
राहुल पंडिता म्हणतात की, "गेल्या 26 वर्षांत कोणत्याही सरकारने असं वातावरण तयार केलं नाही ज्यामुळे काश्मिरी पंडित पुन्हा आपल्या राज्यात येऊ शकतील."
 
ज्या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या ते परत येतात तेव्हा
श्रीनगरच्या जियाना कदाल भागातल्या निमुळत्या गल्लयांमधलं रोशन लाला मावा यांचं दुकान 1990 पासून बंद होतं. पण 2019 साली, तब्बल 29 वर्षांनी ते दुकान पुन्हा उघडलं.त. यापैकी बहुतांश 1990 मध्येच गेले होते.
 
पण काही कुटुंब अशी होती ज्यांनी काश्मीर सोडलं नाही.
 
ते पंडित जे खोऱ्यातच राहिले
पंडित मखन लाल त्या थोडक्या पंडितांपैकी आहेत जे 1990 मध्ये काश्मीर सोडून गेले नाहीत. मखन लाल यांनी आधी आपलं घर सोडलं नाही पण 2001 साली त्यांच्या पत्नीची काही अज्ञात हत्याऱ्यांनी गोळ्या घालून हत्या केल्यानंतर ते भीतीपोटी आपलं खोऱ्यातलं गाव आकुरा सोडून गेले.
 
आता ते जवळच्याच मट्टन गावात आपल्या दोन मुलांसह राहातात. इथे त्यांना सुरक्षित वाटतं. भाड्याच्या दोन खोलीच्या घरात राहाणारे मखन लाल सरकारी कर्मचारी आहेत.
 
काश्मीर का सोडलं नाही याबद्दल बोलताना ते म्हणतात, "काही अडचणी होत्या ज्यामुळे गेलो नाही आणि आपल्या मायभूमीवर असणाऱ्या प्रेमाने इथून जावंस वाटलं नाही."
 
पण काश्मीर न सोडण्याची किंमत त्यांनी आपल्या पत्नीला कायमचं गमावून चुकती केली.
 
ते म्हणतात, "ज्या दिवशी माझ्या बायकोचा खून झाला त्या दिवशी मी स्वतःला म्हटलं की काश्मीर सोडलं असतं तर माझी बायको जिवंत राहिली असती. पण छातीवर दगड ठेवून याला देवाची इच्छा समजलो आणि पुढचं आयुष्य जगायला लागलो."
 
मखन लाल यांना या गोष्टीचं शल्य आहे की त्यांच्या पत्नीची हत्या झाल्यानंतर ती कोणी केली याचा तपास आजपर्यंत झालेला नाही.
 
पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावर त्यांनी दुसरं लग्न केलं.
 
ते म्हणतात, "माझ्या हृदयात किती घाव आहेत ते माझं मला माहितेय. सगळ्यांत मोठं दुःख की माझ्या बायकोची हत्या झाली. दुसरं म्हणजे मला माझ्याच घरात राहून बेघरासारखं जगावं लागलं."
 
मखन लाल काही बोटावर मोजण्याइतक्या काश्मिरी पंडितांपैकी आहेत जे खोऱ्यात राहिले. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
 
ते म्हणतात, "एकतर जेव्हा आमच्याकडे कोणाचा मृत्यू होतो तर त्याचे अंत्यविधी करण्यासाठी जम्मुहून लोकांना बोलवालं लागतं. लग्नासाठी पण अशीच अडचण होते."
 
पत्नीची हत्या झाल्यानंतर त्यांनी काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला आणि एका महिन्यासाठी जम्मूला गेलेही. पण जम्मूला पोहोचूनही त्यांना कोणी भाड्याने जागा दिली नाही त्यामुळे ते परत काश्मीरला गेले.
 
मखन लाल यांना याही गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा त्यांचा एखादा मोठा सण असतो तेव्हा त्यांना काश्मीरच्या बाहेर जावं लागतं.
 
काश्मिरी पंडितांना पुन्हा काश्मीरमध्ये आणून त्यांचं पुर्नवसन करण्याच्या सरकारी योजनांवर टीका करताना मखन लाल म्हणतात की भारत सरकारने आधी इथल्या पंडितांचं व्यवस्थित पुनर्वसन करावं आणि मग जे परागंदा झालेत त्यांना परत आणून वसवावं.
 
त्यांचं म्हणणं आहे की, "आमची घरं मोडकळीला आलीत. ओस पडलीयेत. सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही का?"
 
काश्मीर सोडून गेलेल्या अनेक काश्मिरी पंडितांना परत राज्यात परत यायचं आहे. पण हे शक्य आहे का?
 
राहुल पंडिता म्हणतात की, "गेल्या 26 वर्षांत कोणत्याही सरकारने असं वातावरण तयार केलं नाही ज्यामुळे काश्मिरी पंडित पुन्हा आपल्या राज्यात येऊ शकतील."
 
ज्या काश्मिरी पंडितावर गोळ्या झाडल्या ते परत येतात तेव्हा
श्रीनगरच्या जियाना कदाल भागातल्या निमुळत्या गल्लयांमधलं रोशन लाला मावा यांचं दुकान 1990 पासून बंद होतं. पण 2019 साली, तब्बल 29 वर्षांनी ते दुकान पुन्हा उघडलं.
 
मावा यांचं दुकान पुन्हा सुरू होणं साधी गोष्ट नव्हती. त्यांनी पुन्हा आपला सुकामेव्याचा व्यवसाय सुरू केला तेव्हा आसपासच्या दुकानदारांनी त्यांचं फक्त स्वागत केलं नाही तर त्यांचं कौतुकही केलं. मावा यांचे वडील याच भागात सुकामेवा विकायचे.
 
आज 73 वर्षांच्या असणाऱ्या रोशन लाल मावा यांनी 1990 साली काश्मीर सोडलं होतं. तेव्हा त्यांच्यावर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला होता. त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या आणि या हल्ल्यामुळे त्यांना काश्मीर सोडावं लागलं.
 
जेव्हा मावांनी आपलं दुकान 29 वर्षांनी पुन्हा उघडलं तेव्हा मोठ्या प्रमाणावर स्थानिक मुस्लीम तिथे पोहोचले आणि त्यांच्या ओळखीची अनेक माणसं त्यांच्या स्वागतासाठी गेली.
 
काश्मीर सोडल्यानंतर मावा दिल्लीत राहायला गेले होते आणि तिथे आपल्या व्यवसाय करत होते. ते म्हणतात की दिल्लीत असताना मी एक क्षणही माझ्या काश्मीरला विसरलो नाही.
 
ते भावूक स्वरात म्हणतात की सगळ्या काश्मिरी पंडितांना आपल्या मायभूमीकडे परत आलं पाहिजे. अफवांकडे लक्ष देऊ नका.
 
ते म्हणतात की त्यांना काश्मीरमध्ये परत येऊन भीती वाटत नाही. जगणं-मरणं देवाच्या हातात आहे.
 
काश्मिरी पंडितांसाठी सरकारी योजना
2008 साली भारत सरकारने काश्मीरमध्ये 6000 पदं काश्मिरी पंडितांसाठी आरक्षित केली होती. या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने अनेक ठिकाणी ट्रांझिट कँप बनवले होते.
 
सरकारने काश्मिरी पंडितांसाठी एक वेगळी कॉलनी विकसित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. पण फुटीरतावाद्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आणि म्हणाले की असं करून सरकार काश्मीरच्या लोकसंख्येचं स्वरूप बदलू पाहातंय.
 
'काश्मिरात नोकरी करण्याची शिक्षा मिळाली, हत्या झाली'
2021 साली काश्मिरातल्या हिंदू आणि शिखांवर पुन्हा हल्ले झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये श्रीनगरच्या ईदगाह भागात एका सरकारी शाळेत बंदुकधाऱ्यांनी घुसून हिंदू शिक्षक दीपक चंद आणि शीख मुख्याध्यापिका सुपिंदर कौर यांची गोळ्या मारून हत्या केली.
 
दीपक यांचे भाऊ कमल चंद म्हणतात की, "काश्मिरात जाऊन नोकरी केल्याची शिक्षा माझ्या भावाला मिळाली. त्याची हत्या झाली."
 
दीपक यांचं कुटुंब मुळचं काश्मीरमधलं. पण 1990 साली जेव्हा इथल्या पंडितांना परागंदा व्हावं लागलं तेव्हा त्यांच्या कुटुंबाला विस्थापित होऊन जम्मूत यावं लागलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काहीकाळ जम्मूतच नोकरी केली. पण 2019 साली त्यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या पीएम पॅकेज अंतर्गत काश्मीर खोऱ्यात झाली.
 
जम्मूत अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांची मुलं काश्मीर खोऱ्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात.
 
या घटनेनंतर या कुटुंबांमध्ये पुन्हा दहशत पसरली.
 
ऑक्टोबर 2021 मध्ये श्रीनगरचे प्रसिद्ध फार्मसिस्ट माखन लाल बिंद्रू यांचीही हत्या झाली.
 
दीपक चंद, सुपिंदर कौर, माखन लाल बिंद्रू यांच्यासह सात लोकांची हत्या या काळात झाली.
 
काश्मिरात सध्या 1000 काश्मिरी पंडितांची कुटुंब राहातात आणि या घटनांनी 1990 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या आठवणी ताज्या केल्या. या कुटुंबांनी तेव्हा काश्मीर सोडलं नाही पण आता ते चिंतेत आहेत.
 
माखन लाल बिंद्रू श्रीनगरमध्ये गेल्या 40 वर्षांपासून औषधांची विक्री करायचे. तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांच्या दुकानात इतकी गर्दी असायची की त्यांच्या पत्नीलाही त्यांची मदत करावी लागायची.
 
काश्मिरी पंडितांच्या हत्या
54 वर्षांचे संजय टिक्कू अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात राहाणाऱ्या पंडितांचं प्रतिनिधित्व करतात.
 
ते म्हणतात, "सध्याची परिस्थिती मला 1990 च्या दशकासारखीच वाटते कारण आज मला तशीच भीती वाटतेय. त्या काळात अशाच घटना झाल्या होत्या. आताच्या काळातही अनेक कुटुंब खोरं सोडून गेलेत तर काही इथून परागंदा होण्याच्या विचारात आहेत."
 
ते पुढे म्हणतात की, "मी कित्येक वर्षांपासून इशारे देत आलोय पण माखन लाल बिंद्रूंची हत्या होईपर्यंत सरकारचे डोळे उघडले नाहीत."
 
संजय टिक्की म्हणतात की सरकार असंवेदनशील झालंय.
 
ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या या घटनांनी नंदीमार्ग नरसंहाराची आठवण झाली असं ते म्हणतात.
 
शीख समुदायचे लोक सांगतात की मार्च, 2001 साली अनंतनागच्या चित्तीसिंह पुरामध्ये 30 शीख गावकऱ्यांना ओळीने उभं करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.
 
सुपिंदर कौर यांच्या अत्यंसंस्कारात भाग घेणाऱ्या लोकांनी त्यांचा मृतदेह सचिवालयासमोर ठेवून आंदोलन केलं होतं.
 
एका आंदोलनकर्त्यांने म्हटलं होतं की, "आमच्या मुलीचा जीव घेतला. आम्हाला कोण न्याय देणार? आम्हाला न्याय हवा. ज्या लोकांनी निरपराधांचा खून केलाय त्यांनाही गोळ्या घातल्या पाहिजेत."
 
केंद्रात सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या सरकारांनी वचनं दिली होती की ते काश्मिरी पंडितांना परत आणतील. पण ही वचनं फसवी ठरली.
 
पुर्नवसनाच्या योजनेत गोंधळ
इथले वरिष्ठ पत्रकार आदित्य राज कौल म्हणतात की, काश्मिरी पंडितांच्या पुर्नवसनासाठी जी योजना बनवली आहे त्या अंतर्गत बहुतांश लोकांना सरकारी शाळांमध्ये नोकरी दिली आहे.
 
ते म्हणतात, "या योजनेत गोंधळ असा आहे की यातल्या तरतुदींनुसार लाभार्थ्यांना फक्त काश्मीर खोऱ्यातच नोकरी करावी लागेल. जर ते दुसरीकडे गेले तर त्यांची नोकरी राहाणार नाही."
 
पण गेल्यावर्षी श्रीनगरच्या शाळेत झालेल्या हत्याकांडानंतर इथल्या पंडित आणि शीख शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
 
या योजनेअंतर्गत 2009 नंतर जवळपास 5000 काश्मिरी पंडित खोऱ्यात परत आले.
 
संजय टिक्कू म्हणतात की, "यातले बहुतांश आता पुन्हा काश्मीर सोडून गेलेत. मला सांगितलं गेलंय की 2000 पेक्षा जास्त पंडित काश्मीर सोडून गेले."
 
मालमत्ता परत देण्यावरून भडकतेय हिंसा?
गेल्या वर्षी सरकारने काश्मिरी पंडितांच्या कब्जा केलेल्या स्थावर मालमत्तांवर त्यांना पुन्हा हक्क देण्याची मोहीम सुरू केली होती. म्हणजे काश्मिरी पंडित खोरं सोडून गेल्यानंतर त्यांच्या ज्या संपत्तींवर इतरांनी कब्जा केला होता त्या त्यांच्या मुळ मालकाला परत देण्याची मोहीम.
 
आतापर्यंत अशा 1000 प्रकरणांचा निपटारा करत ती संपत्ती मुळ मालकाला परत दिली होती.
 
अनेक जाणकारांचं मत आहे की काश्मीरमध्ये गेल्यावर्षी पंडित आणि शीखांविरोधात जी हिंसा उफाळली होती त्यामागे हेच कारण असू शकतं.
 
राहुल पंडिता म्हणतात की 2021 मध्ये जम्मू आणि काश्मीर सरकारने एक पोर्टल सुरू केलं. या खोऱ्यातून परागंदा झालेल्या काश्मिरी पंडितांना त्यांची संपत्ती परत देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. याची बरीच जाहिरातही केली.
 
राहुल पंडिता यांना वाटतं की म्हणूनच अचानक हिंसा उफाळली.
 
जम्मू आणि काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ज्या दिवशी औपचारिक उद्घाटन केलं त्याच दिवशी त्यांच्या कार्यालयाने सांगितलं की खोऱ्यातून जवळपास 60 हजार काश्मिरी हिंदूं कुटुंबांचं पलायन झालं होतं.
 
यापैकी 44 हजार कुटुंबांनी राज्याच्या मदत आणि पुर्नवसन आयुक्तांसमक्ष आपली नोंदणी केली होती.
 
उप-राज्यपालांच्या कार्यालयाकडून आलेल्या निवेदनात म्हटलं होतं की या 44 हजार कुटुंबांमध्ये 40,142 कुटुंब हिंदू, 1,730 कुटुंब शीख तर 2,684 मुस्लीम कुटुंब आहेत.
 
सरकारने अजून हे स्पष्ट केलेलं नाही की संपत्ती परत मिळल्यानंतर सरकार अशा पंडितांना सुरक्षा पुरवणार की नाही.
 
(संकलन - अनघा पाठक, बीबीसी मराठी)

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली, फडणवीसांचा गंभीर आरोप