राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर आरोप करत अधिवेशन गाजवल्याचे दिसत आहे. अशातच फडणवीसांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षांकडे आरोपांचे पुरावे असल्याचा पेनड्राईव्ह दिला आहे. त्यानंतर फडणवीस या पेनड्राइव्हमधून बॉम्ब (Pen Drive Bomb) फोडणार असल्याची चर्चा रंगात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत आरोप केले ते म्हणाले, वक्फ बोर्डाच्या एका सदस्याने सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेने तशी तक्रार दिली आहे.
तरीही हा सदस्य मोकाट आहे. शिवाय या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी (dawood) संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात (Waqf Board) कसा? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत.
31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
अर्शद खान अटकेत आहे. त्याचा मोबाईल जप्त करा. त्यात या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या,
असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे.
28 जाने 2020 रोजी ही घटना घडली. लग्नाच्या आश्वासनामुळे ऑक्टोबर 2020पर्यंत ही महिला पोलीस तक्रारीची वाट राहिली. हा प्रकार समजल्यानंतर या महिलेच्या पतीने तिला घटस्फोट दिला.
त्यामुळे या महिलेने लांबेला आत्महत्येचा इशाराही दिला. या महिलेच्या पतीविरोधात लांबेंनी चोरीची तक्रार दिली. त्यानंतर या महिलेचा पती तुरुंगात गेला आहे.
28 जानेवारी 2022 रोजी शीळ डायघर पोलीस ठाण्यात या महिलेच्या पतीविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे या महिलेचा पती तुरुंगात आहे आणि लांबे बाहेर आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.