Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेमभंग झालाय? मग त्यातून बाहेर पडण्यासाठी काय कराल?

webdunia
शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (11:02 IST)
एडविना लेंगले
प्रेमभंगासारखं दुःख नाही हो. बरोब्बर एक वर्षापूर्वी माझा प्रेमभंग झाला होता. प्रेमात असताना तर मी पूर्ण जन्माची वगैरे वचनं दिली घेतली होती आणि अचानक सगळं संपून गेलं.
 
माझ्या लाडक्या व्यक्तीबरोबर मी राहायचा विचार करत होते. तेवढ्यात त्या व्यक्तीनं तिचं मन बदललं. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता, मला तर वाटलं आता मी पूर्वीसारखी कधीच होणार नाही.
 
प्रेमभंग
प्रेमभंगाचं दुःख पचवण्यासाठी मी कधीच सक्षम नव्हते. काहीतरी वेगळं करत राहायचं एवढंच मला कळायचं. मी बाहेर जायचे, दारू प्यायचे आणि ते क्षण विसरायचा प्रयत्न करायचे.
 
काहीही फायदा होत नाही याचा. कसा होणार? मुळात आपण काहीही विसरत नाही. अगदी मनातून पुसून टाकणे वगैरे काही करू शकत नाही.
 
तर गेल्या वर्षी, मी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. माझं वय 32 वर्षं होतं आणि मी लंडन सोडलं. जिथे मी वयाची 27 वर्षं राहिले ते शहर सोडलं आणि एका गावात जाऊन राहायला लागलो.
 
शहर सोडायचं म्हणजे नात्यातून बाहेर पडायचं असं मी ठरवलंच होतं. मला सारखी भीती वाटायची, की मी माझ्या 'एक्स' प्रियकराला बसमध्ये भेटेन, रस्त्यात गाठेन किंवा एखाद्या कोपऱ्यात तरी तो मला दिसेलच. हा विचारच असह्य व्हायचा मला. त्यापेक्षा भलत्याच ठिकाणाहून नवीन सुरुवात करणं माझ्यासाठी सोपं होतं. माझ्याकडे फारसे पैसे नव्हतेच (खात्यात दोन पौंड वगैरे शिल्लक असतील).
 
पण मला एक प्रोजेक्ट मिळाला होता आणि त्याचं बजेटही चांगलं होतं. त्यामुळे मला लवकरात लवकर ते करायचं होतं. त्यानंतरच्या आठ महिन्यांत मी जरा चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न केला - `हार्ट थेरपी' वगैरेसाठी मी भरपूर चालले, समुद्रात सूर मारले, मी भिजले, खूप खूप व्यायाम केला. पण तरीही ती उदासीनता तिथेच होती.
 
एका पक्क्या शहरी माणसासाठी ते गावाकडचं जिणं एकाकी पाडणारं होतं. माझ्या कुटुंबाचा मला भक्कम पाठिंबा होता, पण मला माझ्या मैत्रिणीची आठवण येत होती. थोड्या काळानंतर माझ्या बऱ्याच मित्रांनी मला फोन करणं कमी केलं. अर्थात, काळ कोणासाठी थांबतो? मला भेट देण्याची वचनं हवेत विरली, आणि मला जास्तीत जास्त एकाकी वाटायला लागलं.
 
त्यातून मला प्रश्न पडले : चांगला प्रेमभंग वगैरे काही असतो का? प्रेमभंग हाताळण्याचा काही योग्य मार्ग अस्तित्वात तरी आहे का?
 
माझ्याकडे कुणी लव्हगुरू नव्हता. आता एका वर्षानंतर मीच मला काय सापडलं त्याबद्दल हा लेख लिहित आहे.
 
प्रेमभंग काय असतो?
"सुरुवातीला हे आपलं भावनिक नुकसान असतं,'' असं बिहेवियरल सायकॉल़ॉजिस्ट आणि नातेसंबंधांचे प्रशिक्षक जो हेमिंग्ज विषद करतात.
 
``पण ही भावना सगळ्यांमध्ये वेगवेगळी असते. दुःख, त्रास आणि भावना उचंबळून येणं सहन होत नाही. यामुळे दुःखातून बाहेर पडणं कठीण जातं, पण हे अगदीच ठीक आहे.
 
``मेंदूच्या व्याख्येत बोलायचं झालं तर या भागांमुळे आपल्या शारिरीक त्रासही जाणवतो. याचे विथड्रॉवल सिम्प्टम्स अगदी (ड्रग) व्यसनांसारखेच असतात.''
 
माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे शरीर जाळत जाणारा होता.
 
या विथड्रॉवल सिम्पटम्सशी लढणं माझ्यासाठी अतिशय कठीण होतं. एक्स प्रेयसीला फोन करणं, गप्पा मारणं, जुन्या आठवणींना उजाळा देणं, त्यांच्याशी आपल्या नात्याबद्दल बोलत राहाणं आदी गोष्टी वारंवार कराव्याशा वाटू लागतात.
 
``भावनिक अवस्थेबद्दल बोलायचं तर 'खराब' प्रेमभंग तुम्हाला पाच टप्प्यांमधून जायला लावतो - अस्वीकार, राग, तडजोड, नैराश्य आणि शेवटी स्वीकार असे हे पाच टप्पे आहेत. या प्रक्रियेत ते होतातच.''
 
प्रेमभंगातून कसे सावराल ?
माझ्यामते प्रेमभंग हाताळणं फार काही चांगलं नसतं.
 
पण आपल्या विज्ञानाकडून आपण काहीतरी घ्यायला हवं ना. कितीतरी अभ्यासांतून प्रेमभंगात नेमकं काय होतं आणि आपण त्याच्याशी कसं डील केलं पाहिजे ते मांडण्यात आलं आहे.
 
जर्नल ऑफ एक्सप्रिमेंटल सायकॉलॉजीच्या अलिकडेच प्रकाशित झालेलं संशोधन म्हणजे तीन गोष्टी परिणाम कसा करतात ते सांगतं - यात तुमच्या 'एक्स'विषयी वाईट गोष्टींचा विचार करा, तुमचे त्या व्यक्तीवर किती उपकार आहेत त्याचा विचार करा आणि तुमच्या आधीच्या पार्टनरबरोबरच्या भावनांचा स्वीकार करा, याशिवाय तुम्हाला तुमच्या 'एक्स'चा काहीही संबंध नसलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये अडकवून घेणं पण गरजेचं आहे.
 
आता परफेक्ट कुणीच नसतं ना, ज्यांना हे करून पाहायचंय त्यांच्या पूर्वीच्या पार्टनरविषयीच्या भावनिक प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते, शिवाय या तीनही गोष्टी एकत्रित केल्यानं यातून बाहेर पडायला उत्तम सुरुवात मिळते.
 
माझ्याबरोबर म्हणा : तुमच्या 'एक्स'बरोबर राहाणं कठीण होतं आणि त्यांचं काहीही ऐकणंसुद्धा अहितकारक होतं.
 
पूर्वी : एखाद्यावर प्रेम करणं ही चांगली गोष्ट आहे. आता ती व्यक्ती तुम्हाला हलकट व्यक्ती वाटली तरी तुम्ही केलेलं प्रेम ठीकच होतं.
 
आणि आता शेवटी : या क्षणी भारी वाटतंय की नाही?
 
नातेसंबंधांतील तज्ज्ञ डी होम्स यांनी आणखी चांगली सुरुवात करण्याविषयी सांगितलं आहे, ``स्वतःला वेळ द्या. एखादा दिवस सुट्टी घेणं चुकीचं नाही - तुम्हाला जर धक्का बसला असेल तर तुम्ही नक्कीच सुट्टी घेतली पाहिजे- तुमच्या कामाच्या स्वरूपावर ते ठरवा.''
 
``तुमच्या मित्राशी बोला आणि जे जे वाटतंय ते बाहेर पडू द्या.'' असंही त्य़ा म्हणाल्या. ``पण या भावनांना तुमच्य़ावर हावी होऊ देऊ नका. या टप्प्यावर घाईत निर्णयही घेऊ नका. तुमच्या एक्सबरोबर घरात राहणं तुम्हाल अशक्य वाटत असेल, पण तुम्ही आजूबाजूच्या गोष्टींमध्ये बदल करू शकता. घराच्या भिंती रंगवण्यासारख्या कृतीने तुम्हाला त्या घरात राहावसं वाटेल.''
 
तुमच्या 'एक्स'ला सोशल मीडियावर अनफॉलो करण्याची सूचना जो आवर्जून करतात. ``तुमच्या आठवणींना उजाळा देतील अशा कुठल्याही गोष्टी डिलीट करा किंवा काढून टाका, मग ते फोटो असोत की मजकूर. हे जरा दुष्ट वाटेल पण त्याचा खरंच परिणाम होतो. तुमच्या खासगी भावना जरा कमी होतात. आणि तुमच्या 'एक्स'वर यातून नजरही ठेवता येत नाही आणि त्यांच्या पोस्ट चेक करता येत नाहीत.''
 
तुमचं दुःख आणि रागही यात भाग घेऊ शकतात खरं तर. मला तर त्यावेळेला मी फुटेन की काय असं वाटायचं. पण रागाचेही काही फायदे असतात. तुम्हाला शक्य नाही अशा कुणालातरी विसरणं फारच त्रासदायक असणार आहे. पण बहुतेक तज्ज्ञ रिव्हर्स सायकॉलॉजीचा वापर करायला सांगतात.
 
एका लाइफ कोचचा 'हाऊ टू गेट ओव्हर' या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला भेटलाच नसतात तर वगैरे सांगतात, पण यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटणारी नसतेच.
 
मग तुम्ही स्वतःलाच विचारा, `तुमच्या पुढच्या पार्टनरमध्ये यासारखे गुण मिळणं शक्य आहे का?'
 
मला माझ्या 'एक्स'मधलं काय आवडायचं? तो अतिशय प्रेमळ होता. जगात अन्य प्रेमळ लोकं असतील ना? अर्थात असतील.
 
या विचारानं मला माझ्या नातेसंबंधांची तीव्रता कमी करणं जमायला लागलं.
 
प्रेमभंगाच्या सुरुवातीस हे इतकं सोपं नव्हतं, पुराखालून बरंच पाणी वाहिलेलं होतं, सुरुवात वाईटच होती, लोकं दुःख व्यक्त करायचे आणि मलाही पुन्हा पुन्हा दुःख व्हायचं.
 
पण हळूहळू वेळ जात होता, माझा 'एक्स' प्रियकर अगदीच परफेक्ट नव्हता, त्याच्यासारखी आकर्षकता मला इतरामध्ये शोधता येत होती, हे इतकंही खूप झालं की.
 
हे रिपोर्ट एकत्र केल्यावर एक योजना आखता येते : तुम्हाला जे वाटतंय ते स्वीकारा, स्वतःला वाईट वागण्याची मुभा द्या, आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्र-मैत्रिणींशी बोला आणि गरज पडलीच तर सरळ समुपदेशकाकडे जा.
 
तुम्ही एखादी दैनंदिनी लिहू शकता, सोशल मीडिया टाळा, त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी डिलीट करा, तुमचं लक्ष दुसरीकडे गुंतवा, घाईत निर्णय घेऊ नका, तुमच्या एक्सबरोबर काही संपर्क ठेवू नका, अगदी खासगीतही त्याचा विचार करू नका. त्याच्या चांगल्या बाजूंचा विचार करा आणि स्वतःला समजवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीत पण मिळू शकतात.
 
अर्थात, वेळ हे जखमेवरचं उत्तम औषध आहे.
 
प्रेमभंगातून बाहेर पडण्याची ही प्रक्रिया कितीकाळ चालू शकते?
 
तुम्ही प्रेमभंगाचं गाणं गात राहिलात तर यातून बाहेर पडणं अवघड असतं. एका अभ्यासात साधारण तीन महिने (साधारणपणे 11 आठवडे) एका व्यक्तीला प्रेमभंगातून बाहेर पडायला लागतात असं म्हटलं आहे.
 
मला तर वाटतं, प्रेमभंग काही विज्ञान नाही.
 
मला यातून बाहेर पडायचंय हे ठरवायलाच मला सहा महिने लागले. त्या वेळेस तर मी अगदीच तयार नव्हते.
 
जेव्हा मी अर्थपूर्ण कनेक्शनच्या समर्थतेवर विश्वास ठेवायला लागले, त्याक्षणापासून मला माझ्या एक्सची अजिबात आठवण येईनाशी झाली.
 
माझी वैयक्तिक गोष्ट म्हणजे - प्रेमभंगातून बाहेर येणं ही विरोधाभास असणारी गोष्ट होती, कारण प्रेम ही माझ्यासाठी सगळ्यात सुलभ भावना होती.
 
यातली एक गंमत माहिती आहे का? तुम्ही स्वतःला प्रेमायोग्य समजायला हवं. काही काळ गेला की तुम्हाला परत प्रेम मिळणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

साहित्य संमेलन : फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून विरोध करणं किती योग्य?