Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मतदान LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स

मतदान LIVE : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या बातम्या आणि ताजे अपडेट्स
, सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 (11:44 IST)
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. त्याबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही याच दिवशी होत आहे.
webdunia
सकाळी 11.26 - उद्धव ठाकरे यांचं मतदान
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्व इथल्या जीवन विद्यामंदिरात त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.
 
सकाळी 11.19 - राज ठाकरे यांनी केले मतदान
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधल्या बालोमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
webdunia
सकाळी 11 - मतदारसंघात लढायचं आमचं ठरलं होतं - पृथ्वीराज चव्हाण
 
यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार एवढा का ढेपाळला होता, याविषयी जेव्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं तेव्हा, 'यंदा आम्ही मतदारसंघांमध्ये लढयाचं ठरवलं होतं,' असं उत्तर त्यांनी दिलं आहे.
 
सकाळी 10.52 - काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे मतदान
webdunia
सकाळी 10.43 - गोपीचंद पडळकर यांचे मतदान
गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीमध्ये मतदान केलं. ते बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत.
webdunia
सकाळी 10.40 - बाळासाहेब थोरात यांचे मतदान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये कुटुंबीयांसह मतदान केलं.
webdunia

सकाळी 10.31 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह नागपूरमध्ये मतदान केलं. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठेतील मतदार केंद्रात मतदान केलं. यावेळी त्याच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या.
webdunia
सकाळी 10.24 - प्रकाश आंबेडकर यांचे मतदान
'जसं पावसाने हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरवला तसंच तुम्हाला निवडणुकीत दिसेल,' असं मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
 
सकाळी 10.15 - विकास महात्मे यांचे सायकलवरून मतदान
webdunia
सकाळी 10.10 - नवनीत राणा यांचे मतदान
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवीराणा यांनी अमरावतीमध्ये मतदान केलं.
 
सकाळी 10 - शरद पवार यांचे मतदान आणि आवाहन
शरद पवार यांनी मुंबईमध्ये त्यांच्या मतदनाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. निसर्गाचं सहकार्य नसलं तरी मतदान करा असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं आहे.
webdunia
सकाळी 9. 30 - रोहिर आर. आर. पाटील यांचे मतदान

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vodafoneची स्वस्त डेटा योजना, कॉलिंग आणि एसएमएस सुविधा सुरू करणार, जिओला स्पर्धा देईल