विरोधी पक्षांची बैठक बोलावून सरकारला विरोध करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रयत्नांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धक्का दिला आहे. 13 जानेवारी रोजी सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे.
डावे पक्ष आणि काँग्रेसकडून ममता बनर्जी यांच्यावर सतत टीका होत आहे. त्यामुळे बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला असावा.
पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांना दोषी ठरवत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवल्याचा आरोप केला होता.