"भारतीस सरकारी बँकांसाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि रिझर्व्ह बँकेचे रघुराम राजन यांचा काळ सर्वांत वाईट होता," अशी टीका अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्समध्ये आयोजित व्याख्यानात त्यांनी ही टीका केली आहे. "नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत. ते कमालीचे एककल्ली नेते होते. अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे दृष्टी नव्हती", अशा शब्दांमध्ये राजन यांनी ब्राऊन विद्यापीठात टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सीतारामन यांनी यांनी ही टीका केली.
"राजन यांच्या कार्यकाळामध्ये बँकांनी नेत्यांच्या फक्त एका फोनकॉलवर कर्जे दिली. त्यातून बसलेल्या फटक्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी बँका आजही सरकारकडून होणाऱ्या भांडवलपुरवठ्यावरच विसंबून आहेत", असे सीतारामन म्हणाल्या.